Yashomati Thakur यांची सरकारवर घणाघाती टीका

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे आणि आज विरोधी पक्षाचे आमदार नसल्याने अमरावतीच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात (Monsoon Session 2023) जोरदार हल्लाबोल केला आहे.

Yashomati Thakur यांची सरकारवर घणाघाती टीका

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे आणि आज विरोधी पक्षाचे आमदार नसल्याने अमरावतीच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात (Monsoon Session 2023) जोरदार हल्लाबोल केला आहे. रोजगार हमी योजनेच्या कामामधील कुशल कामगारांचा निधी केवळ सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघामधून भरभरून मिळतो. परंतु विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मदारसंघामध्ये हा निधीच मिळत नाही. हा प्रचंड दुजाभाव आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून त्यांना निधी मिळतो आणि आम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहोत म्हणून आमचा निधी वितरीत होत नाही असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी सभागृहामध्ये केला आहे.

 

पुढे यशोमती ठाकूर म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात भरभरुन हा निधी मिळतो. मात्र, आम्ही विरोधी बाकावर बसलो आहोत म्हणजे आम्हाला निधी द्यायचा नाही, हा कुठला न्याय आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करुन त्या म्हणाल्या की, सध्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या आमदाराचा आवाज दडपण्यात येतो आहे, अशीच परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. रोजगार हमीच्या कुशल कामगाराच्या निधीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या खात्याचे मंत्री याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. त्यांना याबाबत काहीही माहिती नसते. मग या प्रश्नाचे उत्तर देणार कोण? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. तर, ऑनलाईन पद्धतीने निधी वितरीत होतो, हा सर्व बनाव आहे. केवळ टक्केवारीचा घोळ सुरु आहे. आता निधी वाटपातही टक्केवारी येत असेल तर यापेक्षा दुर्दैव असूच शकत नाही, अशी घणाघाती टिकाही त्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा:

Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्यां ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता…

लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल Gigi Hadid ला अटक

इर्शाळवाडी दुर्घटनेवर देवंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, अपघातग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version