spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Yogi Adityanath यांचं उत्तर प्रदेश विकासावर भाष्य, उत्तर प्रदेशचे आहोत हे सांगायला संकोच व्हायचा…

उत्तर प्रदेशातले रस्ते चांगल्या दर्जाचे झाले आहेत. तसेच गोरखपूरवरुन १४ ठिकाणी फ्लाईट कनेक्टिव्हिटी (Flight connectivity) आहे, तर त्यासोबतच ९ विमानतळे (Airports) देखील उत्तर प्रदेशमध्ये आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक (investment) वाढवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुंबईतील उद्योगपतींची भेट घेऊन उत्तरप्रदेशमधील उद्योगधंद्यामध्ये गुंतवणूक करण्यासंबंधित चर्चा करणार होते. तसेच नोएडा (Noida) मध्ये फिल्मसिटी (Filmcity) उभारण्याच्या विषयावर देखील मुंबईतील सिनेदिग्दर्शक (Film director) तसेच निर्मात्यांची (producers) देखील भेट घेणार होते. त्याचबरोबर बँक अधिकाऱ्यांशी (Bank Officers) देखील चर्चा करणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचा कसा विकास होत आहे, यावर भाष्य केलं. तसेच कोव्हिड (covid) च्या काळात त्यांनी नागरिकांचं कसं संरक्षण केलं त्याविषयी सुद्धा भाष्य केलं.

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले,”उत्तर प्रदेशातले रस्ते चांगल्या दर्जाचे झाले आहेत. तसेच गोरखपूरवरुन १४ ठिकाणी फ्लाईट कनेक्टिव्हिटी (Flight connectivity) आहे, तर त्यासोबतच ९ विमानतळे (Airports) देखील उत्तर प्रदेशमध्ये आहेत. या ९ विमानतळांसोबतच आम्ही आजमगड, अलिगड, सहारणपूर, चित्रकूट, श्रावस्तीमध्ये सुद्धा विमानतळ बनवतोय.” त्याचबरोबर आशियातील सर्वात मोठं विमानतळ देखील उत्तर प्रदेशमध्ये बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. यापुढे ते असंही म्हणाले,”यापूर्वी कोणी आझमगडमध्ये विमानतळाचा विचार करू शकत होता का? मुंबईचे लोक तर आझमगडच्या नावाला घाबरत होते, पण आज आझमगडमध्ये विमानतळ बनत आहे, तिथले खासदार आता मायानगरीचा भाग आहेत.”

त्याचबरोबर त्यांनी कोव्हिड संकटाच्यावेळी नागरिकांना केलेल्या संरक्षणविषयी सुद्धा सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,”संकटाच्या काळात कोण आपल्यासोबत उभा असतो तो खरा कसोटीचा काळ असतो. कोव्हिडमध्ये आम्ही प्रवाशांसाठी आपले दरवाजे उघडले होते. ४० लाख प्रवासी आमच्याकडे आले होते. मला आनंद आहे प्रत्येक उत्तर प्रदेशवासीने अनुशासन पाळले. आम्ही संकटकाळी मदत करतो, पळून जात नाही. उत्तर प्रदेशच्या लोकांसमोर आपण उत्तर प्रदेशचे आहोत हे सांगायला संकोच व्हायचा, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. केंद्राच्या मदतीनं हे सर्व शक्य झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

Amazon मध्ये काम करणाऱ्या १८,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा!

पक्ष बळकटीसाठी उद्धव ठाकरे स्वतः राहणार नाशिकमध्ये उपस्थित, जानेवारीअखेरीस होणार जाहीर सभा

Mhada नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात, स्वतःच्या हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss