spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवार कधी मारतील याची तुम्ही वाट बघत आहेत: जितेंद्र आव्हाडांनी साधला अजित पवारांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आज अजित पवार यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवारांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतंय, शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवून देईल, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करण कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय . शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता.अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावे काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघता आहेत. असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवारांचा प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचे दिल्लीमधील एक भाषण दाखवावे . साहेबांची खरी चूक आहे साहेबांनी अजित पवार यांना कधी ओळखले नाही. राज्यात उत्पादन मागितले ते दिल फक्त पैसे खाण्यासाठी. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपट

मराठी पडदा गाजवायला सज्ज, नवरा माझा नवसाचा २ मध्ये पुन्हा एकत्र येणारं अशोक सराफ-सचिन पिळगावकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss