spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं- उद्धव ठाकरे य यांची शिंदे गटावर टीका

काल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने यासाठी भाजपला जबाबदार धरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस परवडली, असं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसच्या काळातही शिवसेनेवर बंदीची चर्चा झाली होती. पण शिवसेनेचं काम पाहून बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला. काँग्रेसने देखील बंदी घातली नाही. जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. मग पापी कोण, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारसह एकनाथ शिंदे गटाला केला आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाला, पक्ष फोडला ते ठीक आहे. पण आता यांना पक्षप्रमुख व्हायचं आहे. हे अति होतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला राग व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता, उद्धव ठाकरे कधी संतप्त होताना दिसत नाही. मात्र आज त्यांनी आता बास म्हणत सूचक विधान केलं आहे.

यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे दिली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये दिली आहे. त्याशिवाय त्यांनी पक्षासाठी तीन चिन्हेही निवडणूक आयोगाकडे दिल्याचं सांगितलं. यामध्ये त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य ही तीन चिन्हं दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. निवडणूक आयोगानं लवकरात लवकर निर्णय द्यावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवतिर्थावर दसरा मेळावा, होऊ नये म्हणूनही खोकासूरांनी प्रयत्न केले. मैदानच शिवसेनेला मिळता कामा नये, म्हणून प्रयत्न केले. पण अखेर न्यायदेवता.. देवता या शब्दाला जागली आणि न्याय दिला. दसरा मेळाव्याला गर्दी झाली. चांगला प्रतिसाद मिळाला. त्या दिवशी दोन दसरा मेळावे झाले असे म्हणतात… एका ठिकाणी सर्व काही पंचतारांकित होतं. पण दुसऱ्या बाजूला शिवसैनिक होते. काही दिव्यांग होते, नेत्रहिन होते, काही लांबून चालत आले होते. यांची काय व्यवस्था होती, काय पंचपक्वान होतं. पण ते स्वत:ची मिठभाकरी घेऊन आले होते. आर्धी भाकर खाईल उपाशी राहिल.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray : आता बास अति होतंय… म्हणत सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले!

फेसबुक लाईव्हमार्फत उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका; ४० डोक्याच्या रावणानं …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss