spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात युवा काँग्रेस आक्रमक; ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यााचे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात ‘उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’ हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरला रोजी राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येईल. तसेच या आंदोलनात सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील व सर्व प्रदेश पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवतील, असेही शेख म्हणाले.

या आंदोलनांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फोटो असणारी कागदी विमाने हवेत उडून निषेध करण्यात येईल. तसेच गाजरे हातात घेऊन शिंदे-फडणीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येईल. विशेष म्हणजे राज्यभरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. आधी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेला गुजरातला, आता एअरबस-टाटा मिलिटरी एअरक्राफ्ट २२ हजार कोटींचा लष्करी ट्रान्सपोर्टचा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा हा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकार गुजरातला देऊन, अतिशय चांगल्या प्रकारे गुजरातची चाकरी करताना दिसत आहे. अजून किती प्रकल्प जाणार गुजरातला, असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला.

हे ही वाचा :

Tata Air Bus Project : उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहे की गुजरातचे ?, नाना पटोलेंचा सवाल

गुन्हेगार पोलिसांवर भारी, रात्री उशिरा अंधारात का थांबले? विचारणा केल्यास पोलिसांनाच मारहाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss