युवा नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर

महाराष्ट्रातील युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज हैदराबाद (Hyderabad) दौऱ्यावर असणार आहेत यादरम्यान आदित्य ठाकरे हे गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

युवा नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर

महाराष्ट्रातील युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज हैदराबाद (Hyderabad) दौऱ्यावर असणार आहेत यादरम्यान आदित्य ठाकरे हे गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याशिवाय येथील विद्यार्थ्यांना संबोधित देखील करणार आहेत. याच दरम्यान आदित्य ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांची सुद्दा भेट घेणार आहेत असे सांगण्यात आले आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे विविध ठिकाणी दौरा करत आहेत महिला सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आहे. विविध भागांमध्ये सभा घेत पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी आदित्य ठाकरे मैदान गाजवत आहे. आदित्य ठाकरे हे आज हैदराबाद दौऱ्यावर असून ते बेगम पेठ विमानतळावर पोहोचले आहे. त्यांनतर आदित्य ठाकरे आणि के टी राव यांच्यात बैठक सुरू आहे.

के टी राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत के सी राव यांचे पुत्र असून ते तेलंगणाचे नगरविकास मंत्री आहे. यादरम्यान गीतम विद्यापीठाने आयोजित केलेल्या युवा राजकारणी संवाद कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे हे हैदराबादमध्ये जाण्यामागील काय कारण असणार याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये यामध्ये आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच जाणार होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय मागील काही दिवसांपासून बीआरएस पक्ष देखील महाराष्ट्रात प्रवेश करू इच्छित आहे. यामध्ये मराठवाड्यातही सभांचा धडाका त्यांनी लावला आहे.

याआधी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनीही मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुबांची भेट घेतली होती. त्यांनतर राजकीय चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर बीआरएस सोबत ठाकरे गत युती तर करणार नाही ना? किंवा बीआरएस पक्षाच्या सोबत नवी राजकीय चाल तर खेळली जाणार नाही ना? अशी ही चर्चा रंगली होती आहे. तेलंगणा राज्यामध्ये झालेला विकास पाहता तो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी के चंद्रशेखर राव हे प्रयत्न करत आहे. त्यांनी नांदेड मध्ये येऊन त्यांनी हाकही दिली आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची चर्चा होते का ? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version