spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राच्या तरुणांनी आरती करा, हनुमान चालीसा करा, मोर्चे करा, फटाके उडवा…; छगन भुजबळ

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातच्या वडोदरामध्ये होणार असल्याचं काल स्पष्ट झालं. संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटा एअरबस प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. वेदांता फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

टाटा एअर बस प्रकल्पाला मी नाशिकात येण्याचीही विनंती केली होती, त्यांना पत्रही पाठवले होते. यानंतर मी पुढे काही करून शकलो नाही, कारण माझा विभाग वेगळा होता आणि नंतर करोनाशी संबंधित घडामोडीही सुरू होत्या. परंतु, एका पाठोपाठ एक मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. वेदान्त, विमानाबाबतचा टाटांचा प्रकल्प याशिवाय आणखी काही प्रकल्प गेले. टाटांचं सगळं महाराष्ट्रात आहे, ते कधीही महाराष्ट्राला प्राधान्य देत असतात. पण अचानक काय झालं कल्पना नाही आणि हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले. आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं?, आरती करा, हनुमान चालीसा करा, मोर्चे करा, फटाके उडवा… करायचं काय?, आपण दहिहंडी करत बसलो, करायचं काय? सगळं एवढं शिक्षण होतं, चांगलं होतं. तरी सुद्धा हे प्रकल्प जायला लागले आहेत. असं छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे.

“सरकार आमचं असेल किंवा शिंदे-फडणवीस यांचं असेल, पण फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या शब्दाला दिल्लीत निश्चतपणे किंमत आहे. अर्थात हे सगळं जे आहे हे नागपूरला व्हावं असा सुद्धा प्रयत्न झाला. मध्यवर्ती म्हणून पण त्यांनी सुद्धा तेव्हापासून प्रयत्न केले पाहिजे होते आणि आता तर नक्कीच केले पाहिजे होते. मला कल्पना आहे की एकनाथ शिंदे हे करू शकणार नाही. परंतु फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीत यापुढे लक्ष घातलं पाहिजे. यातही लक्ष घातलं पाहिजे. आता जे झालं तर त्यावर बोलण्यापलीकडे किंवा टीका, टिप्पणी करण्यापलकडे आपल्या हाती काही नाही. परंतु त्यांनी यापुढे काळजी घेतली पाहिजे.” असंही छगन भुजबळांनी यावेळी बोलून दाखवलं.

हे ही वाचा :

तणाव : काश्मीरची दाहकता दाखवणारी आगामी वेबसीरीज लवकरच

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची FDA विरोधात हायकोर्टात धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss