शहाजी बापू पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे युवासेना झाली आक्रमक

असे वक्तव्य करण्यापूर्वी शहाजीबापू यांनी संत्र्याची दारु प्यायली होती की हातभट्टीची

शहाजी बापू पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे युवासेना झाली आक्रमक

एकनाथ शिंदे गटातील गुहावटी फेम शाहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी “मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर काय लक्ष ठेवायचं ते ठेवा आणि काय पाडायचं ते पाडाय राज्यात सर्वाधिक वेळा पडण्याचा विक्रम माझ्याच नावावर आहे.” केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेनेच्या युवासेनेकडून बरीच नाराजी व्यक्त केली जात आहे.

एवढच नव्हे तर त्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, आमदार शहाजीबापू यांनी तोंड बंद ठेवले नाही तर त्यांच्या घरावर साडी आणि बाटल्यांचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील युवासेनेने दिला आहे. शहाजी पाटलांनी एवढ्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीबाबत आक्षेपार्ह विधान करुन फार मोठी चूक केली आहे. त्यांनी जर ही टीका बंद केली नाही तर त्याचे परिणाम त्यांना मोर्च्यातून पाहायला मिळतील असा अशारा युवा सेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी दिली आहे.

शहाजीबापू बायकोला साडी घेऊ शकत नाही, असे सांगत होते. याची आठवण करून देत हे आमदार महोदय उद्धव ठाकरेंना काय भाड्याने बंगला घेऊन देणार असा सवाल युवा सेनेने विचारला आहे. असे वक्तव्य करण्यापूर्वी शहाजीबापू यांनी संत्र्याची दारु प्यायली होती की हातभट्टीची, हे पाहावे लागेल, अशी टीका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शहाजीबापू दारू प्यायला बसल्यावर ते स्वतः बील देवू शकत नाही. दुसऱ्याला बील द्यावे लागते. अशी टीकाही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

शहाजीबापू पाटील यांनी जर ही अशी वक्तव्य करणं थांबवलं नाही तर, पडसाद महाराष्ट्रभर उठतील आणि याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असतील, असेही .युवा सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “शहाजीबापू यांना पुढच्या निवडणुकीत जिंकता येणार नाही” शिवसेनेनं केलेल्या या टीकेला उत्तर देताना शहाजीबापू पाटील यांनी हे वक्तव्य केले होते.

हे ही वाचा:

गौरीपूजनास महालक्ष्मी पूजन देखील म्हणतात, जाणून घ्या गौरी आगमनाबद्दल

दसऱ्या मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरूच; शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी केला शिवाजी मैदानासाठी महानगरपालिकेत अर्ज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version