युवासेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर, युवासेना तालुका प्रमुखाने केला आत्महत्येचा प्रयत्न

युवासेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर, युवासेना तालुका प्रमुखाने केला आत्महत्येचा प्रयत्न

सध्या ठाकरे गटाला एक मागून एक धक्के बसत आहेत. या आधी ठाकरे गटाच्या महिलांचा वाद त्यानंतर आता युवासेनेमध्ये. अंबाजोगाई (Ambajogai) युवासेना तालुका प्रमुखाने (Yuvasena Taluka Chief) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवासेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या जाचाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. अक्षय भूमकरतालुका प्रमुख (Akshay Bhumkar) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न त्याने केला. अक्षय अवघ्या २५ वर्षांचा आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पत्र लिहून त्याने जीवनाची अखेर करण्याचा निर्णय घेतला होता.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आपण आत्महत्या करत असल्याचं पत्र अक्षयने लिहिलं आणि सोशल मिडीयावर पोस्ट केलं होतं. युवासेना विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे (Vipul Balasaheb Pingle) यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अंबाजोगाईमध्ये पंचायत समिती आवारात त्याने विषारी औषध प्राशसन केले, मात्र या घटनेची माहिती अक्षयच्या मित्रांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन अक्षयला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात (Swami Ramanand Tirtha Government Hospital) दाखल केले. सध्या या ठिकाणी त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून युवासेनेचे तालुका प्रमुख अक्षय भूमकर यांनी आत्महत्यांचं प्रयत्न केला. मात्र सुदैवाने आत्महत्येच्या हेतूने विष प्राशन केल्यानंतर मित्रांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अक्षयला अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू आहेत, मात्र या घटनेने सध्या बीड जिल्ह्यात राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

BrahMos Missile ची IAF ने केली यशस्वी चाचणी घेतली, जाणून घ्या शत्रूला हादरवणाऱ्या ‘या’ क्षेपणास्त्राची खासियत

‘Goodachari 2’ असेल आदिवी शेषचा पुढचा चित्रपट, जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार अभिनेता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version