शिवसेनेचा आक्रमक इशारा, शिवतीर्थचा मुद्दा ताणल्यास थेट उतरणार मैदानात

प्रकरण आणखी ताणल्यास थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या इशारा आता शिवसेनेने दिला आहे. 

शिवसेनेचा आक्रमक इशारा, शिवतीर्थचा मुद्दा ताणल्यास थेट उतरणार मैदानात

शिवसेना आणि शिंडेगटात गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थवरून वाद सुरू आहेत आणि त्यात शिवतीर्थवर नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार हे अद्यापही मुंबई महानगपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास थेट कोर्टात जाण्याचा आणि या निर्णयाचा सोक्षमोक्ष लावण्यास अजून उशीर केल्यास किंवा हे प्रकरण आणखी ताणल्यास थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या इशारा आता शिवसेनेने दिला आहे.

शिवतीर्थवर दसरा मेळावा कोण करणार हे ठरवण्याचा अधिकार मुंबई महानगरपालिकेकडे आहे. शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही गटांकडून या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली जातेय. मात्र निर्णय घेण्याआधी विधी व न्याय विभागाचा सल्ला मुंबई महापालिका घेत असल्याची माहिती आता समोर येत आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोघांचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आले आहेत. पहिला अर्ज शिवसेना ठाकरे गटाने केला असल्याने शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. कारण शिवसेनेकडे दसऱ्या मेळाव्यासाठी शिवतीर्थ हा एकमेव पर्याय आहे. मात्र मुंबई महापालिका हे प्रकरण ताणत असून निर्णय घेण्यास उशीर लावत असेल तर दसऱ्याच्या दिवशी थेट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे.

शिवसेना आणि शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे. परंतु शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे यंदा शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मेळाव्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेनेबरोबरच शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र शिवतीर्थ कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावं याकरता शिंदे गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीएने स्वीकारला आहे. तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारल्यास शिंदे गटाला बीकेसीचा पर्याय उपलब्ध असेल, हे स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा:

खा.संजय राऊतांचा गरबा तुरुंगातच, न्यायालयाच्या ‘या’ निर्णयनाने शिवसेनेला धक्का

gram panchayat election result : संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं, तर धुळ्यात भाजपचं निर्विवाद यश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version