१५०० कोटींचे मॅच फिक्सिंग करणारा बुकी अनिल जयसिंगानीया यांच्या अडचणी वाढणार

१५०० कोटींच मॅच फिक्सिंग करणारा बुकी अनिल जयसिंघानिया याच्या अडचणीत वाढ होणार आहे.

१५०० कोटींचे मॅच फिक्सिंग करणारा बुकी अनिल जयसिंगानीया यांच्या अडचणी वाढणार

१५०० कोटींच मॅच फिक्सिंग करणारा बुकी अनिल जयसिंघानिया (Anil singhaniya ) याच्या अडचणीत वाढ होणार आहे. काही दिवसांपूर्वी बुकी असणारा अनिल जयसिंघानिया याला मुंबई गुन्हे शाखेने गुजरात मधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुकी अनिल जय सिंघानियाला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली होती. आणि आता या दरम्यान गुन्हेशाखेकडून मिळालेल्या माहिती नुसार अनिल सिंघानिया हा १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत असताना चौकशी दरम्यान आणखी एक नवीन खुलासा समोर आला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बुकी अनिल सिंघानिया याच्या अडचणीत वाढ होणार हे निश्चित झाले आहे.

१५ कोटींच मॅच फिक्सिंगचे (Match fixing ) रॅकेट समोर आल्यानंतर बुकी अनिल सिंघानिया आणि त्याचा फरार असलेला बुकी मित्र रमेश यांचे फोन वरचे संभाषण समोर आले आहे. या संभाषणातून असे समोर आले आहे की, यामध्ये प्रामुख्याने पोलीस आणि काही क्रिकेटपटूंचा(cricketers) देखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत.

तसेच समोर आलेल्या ऑडिओ क्लिप(oudio clip ) मधून अनिल सिंघानियाने रमेश नावाच्या व्यक्तीसोबत अज्ञात व्यक्तीच्या नावाने संभाषण सुरु करून बुकी रमेश याला मुंबईमध्ये जागा घेण्याविषयी आणि तुमच्या स्वतःच्या सुरक्षितते विषयी हमी दर्शविली आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये काही पोलीस देखील समाविष्ट असतील यात काही शंकाच नाही. त्याचबरोबर अमृता फडणवीस याना लाच देण्याप्रकरणीअनिष्का जयसिंघानिया हिला देखील गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यामधून या प्रकरणी देखील तपास करून नवीन खुलासे समोर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Exit mobile version