spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

३-० ने भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, क्रमवारीतही पटकावले अव्वल स्थान

प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ केवळ २९५ धावा करू शकला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना ९० धावांनी जिंकला आणि मालिकाही ३-० अशा फरकाने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ केवळ २९५ धावा करू शकला आणि त्यांना सामना गमावला.

भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत किवी संघाचा सफाया केला. विराट कोहलीने युझवेंद्र चहलच्या चेंडूवर सॅन्टनरला झेलबाद करून न्यूझीलंडचा डाव संपवला. सँटनरने २९ चेंडूत ३४ धावा केल्या. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ वनडेत जगातील नंबर वन संघ बनला आहे. आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ रांची येथे २७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भिडतील.

सामन्यात काय घडले?

भारताने प्रथम फलंदाजी करताना ३८५ धावा केल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. हार्दिक पांड्याने अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात डेव्हॉन कॉनवेने न्यूझीलंडकडून शतक झळकावले, पण त्याला एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही. हेन्री निकोल्स आणि सँटनर यांनी प्रयत्न केले, पण दोघांनाही अर्धशतकेही करता आली नाहीत. अखेर भारताने हा सामना ९० धावांनी जिंकला.

दोन्ही संघांचे प्लेयिंग ११:

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जेकब डफी, ब्लेअर टिकनर, लॉकी फर्ग्युसन.

हे ही वाचा:

चार्टर प्लेन वेळेवर पोहचायला घेता की उशीर जायला घेता, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

IND vs NZ 3rd ODI रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ३ वर्षांनंतर हिटमॅनने झळकावले ODI शतक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss