ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; सामन्या आधीच गोलंदाज बाहेर

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; सामन्या आधीच गोलंदाज बाहेर

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी२० विश्वचषक २०२२ (T२० World Cup २०२२) स्पर्धा सुरु आहे. आज ह्या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रलियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना सायंकाळी ४:३० वाजता सुरु होईल. पण ह्या महत्वाच्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे . संघाचा मुख्य गोलंदाज अॅडम झाम्पा कोविड-१९ पॉझिटिव्ह (Adam Zampa Corona Positive) आढळला आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. अशा स्थितीत झाम्पाला या सामन्यात खेळायला मिळेल अशी शक्यता अत्यंत कमी दिसत आहे.

दरम्यान विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने (ICC New Regulations) नवीन नियमावली आणत स्पर्धेमध्ये, कोविड -१९ संक्रमित खेळाडूंना (Corona Positive Players) देखील वैद्यकीय टीमच्या परवानगीनंतर खेळता येईल अशी घोषणा केली होती. रविवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात कोविड पॉझिटिव्ह असूनही आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल प्लेइंग-११ मध्ये सामील होता. त्यामुळे आज झाम्पाही ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-११ मध्ये सहभागी होऊ शकतो. पण त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? तसंच वैद्यकीय टीम काय सूचना देईल? यावर झाम्पाचं आजच्या सामन्यात खेळणं अवंलंबून असणार आहे.

अॅडम झाम्पा (Adam Zampa)हा ऑस्ट्रेलियन संघाचा (Team Australia) मुख्य गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ५.३४ इतका आहे. अशा परिस्थितीत जर तो आज श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळू शकला नाही तर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसणार आहे.त्यामुळे ऑस्ट्रेलियान संघाने खेळाबाबतचे आखलेले नियोजन पूर्णतः कोलमडून जाईल आणि त्यांना पुन्हा नवीन नियोजन आखावे लागेल ऑस्ट्रेलियन संघाला बदलावे लागतील

टी२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे संघाचा नेट रन रेट खूपच खराब झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आता सामने गमावले तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत खूप मागे पडू शकतात. यामुळेच आजचा सामना ऑस्ट्रेलियन संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.

हे ही वाचा :

पुराव्याशिवाय पतीला ‘पत्नी’, ‘मद्यपी’ म्हणणे क्रूरता : मुंबई उच्च न्यायालय

Prime Minister Rishi Sunak : पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता हे ब्रिटनच्या राजा चार्ल्सपेक्षा श्रीमंत

Eknath Shinde: समृद्धी महामार्गासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version