spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs ENG: नाणेफेक जिंकून इंग्लंडने घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आता फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरला आहे. आज भारताकडे पहिली फलंदाजी असल्याने एक मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. विशेष म्हणजे भारतानं आज कोणतेही बदल अंतिम ११ मध्ये केलेले नाहीत. त्यामुळे स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) संघात कायम ठेवण्यात आलं आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा एक संघ निश्चित झाला. बुधवारी (९ नोव्हेंबर) पाकिस्तानने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला आणि अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. त्यांना आता भिडणार कोण यासाठी गुरूवारी (१० नोव्हेंबर) भारत-इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना ॲडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे. आयसीसी टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनल लढतीला सुरूवात झाली आहे. ॲडलेड ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीमधील विजेता संघ १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न मैदानावर पाकिस्तानविरुद्ध जेतेपदासाठी लढले. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या झिम्बाब्वेच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत संघात खेळणार आहे.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

इंग्लंडचा संघ :

अॅलेक्स हेल्स, जोस बटलर(कर्णधार), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.

हे ही वाचा :

Uddhav Thackeray and Sanjay Raut Live : राऊतांच्या धाडसाचे कौतुक करत, केंद्रीय यंत्रणायाना पाळीव प्राणी म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

Sanjay Raut: खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल; आदित्य ठाकरे – संजय राऊतांची गळाभेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss