क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट हा खेळ नेहमीच चर्चेत असतो. याच खेळासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेकदा सोशल मीडियावर खेळाडूंचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. केव्हा ते व्हिडिओ गमतीशीर असतात तर कधी त्यात खेळाडूंमधील बाचाबाची (Cricket Fight)पाहायला मिळते. मात्र खेळाडूंमध्ये हाणामारी, मारामारीच्या घटना बऱ्याच कमी पाहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्ही चकित व्हाल. दोन खेळाडूंमध्ये भांडण होऊन विषय अगदी हाणामारीपर्यंत पोहचलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये सर्वच स्पष्ट पहायला मिळतंय. अशीच एक घटना गेल्यावर्षीही बांग्लादेशात (Bangladesh)झाली होती. अंपायरच्या एका निर्णयामुळे दोन्ही टीममधील खेळाडू एकमेकांसोबत भिडले होते. त्याचबरोबर भारतातही (India) देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये बऱ्याचदा बाचाबाचीच्या घटना पाहायला मिळतात.

दोन खेळाडू प्रत्यक्ष एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा (Social Media Viral Video)हा व्हिडिओ (MCC) एमसीसी वीकडे बॅश XIX लीगचा आहे. ही लीग युएई (UAE) मध्ये खेळवली जाते. या लीगमध्ये एरोविसा क्रिकेट आणि रबदान क्रिकेट क्लबमध्ये एक सामना झाला त्यातील दोन खेळाडूंचा हा व्हिडिओ आहे. सामन्यादरम्यान एरोविसा क्रिकेट टीमच्या एका गोलंदाजाने रबदान टीमच्या एका फलंदाजाला आऊट केल्यानंतर जोरात सेलिब्रेशन केलं. गोलंदाजाने संपूर्ण जोशात येऊन विकेटचे सेलिब्रेशन करून आक्रमकता दाखवून दिल्यामुळे हा प्रकार घडला.

गोलंदाजांचे इतक्या जोशात येऊन केलेले सेलिब्रेशन पाहून फलंदाजाचा स्वतःवरील संयम सुटला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर नंतर मारामारीपर्यंत पोहचून दोन्ही खेळाडू मैदानातच खाली पडले. टीममधील इतर खेळाडूंनी आणि अंपायरने दोघांना बाजूला करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र या घडलेल्या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. बऱ्याचदा खेळाडूंमध्ये शाब्दिक मतभेद पाहायला मिळतात परंतु हा प्रकार सामान्य नाही.

हे ही वाचा:

PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ
 
चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र
 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version