T२० च्या दुसऱ्या सामन्यात भारतिय संघाची धुवादार सुरुवात

T२० च्या दुसऱ्या सामन्यात भारतिय संघाची  धुवादार  सुरुवात

भारताचा न्यूझीलंड दौऱ्यातील हा दुसरा टी२० सामना आहे कारण पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) दुसऱ्या T२० सामन्याला सुरुवात झाली आहे हा सामना न्यूझीलंडच्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवरसुरु आहे. नाणेफेकीमध्ये न्यूझीलंडच्या बाजूने कौल लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळीस भारतीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या सांभाळणार आहे.

ऋषभ पंत आणि ईशान किशन यांनी फलनदाजीला सुरुवात केली आहे . ऋषभ पंत ६ धावांवर बाद झाला असून ईशान किशनने पदभार स्वीकारला आहे .ऋषभ पंत नंतर सूर्यकुमार यादव मध्यभागी किशनला सामील झाला आहे . T२० विश्वचषकात एकही सामना न खेळलेल्या युझवेंद्र चहलला यावेळेस प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहेत्याच बरोबर वॉशिंग्टन सुंदरचाही समावेश आहे, तर उमरान मलिकला घेण्यात आले नाही . दरम्यान, T२० विश्वचषकातील आणखी एक निराशाजनक खेळानंतर, हार्दिक पंड्या आणि कंपनीला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. सध्या सूर्यकुमार यादव एक बाजू सांभाळत असून ईशान किशन स्ट्राईकवर अधिक धाव करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे .

सध्या ८ ओव्हर ६१ धाव झाल्या आहेत सूर्यकुमार यादवने ११ चेंडूंवर १७ धाव केल्या असून ईशान किशनने ३०चेंडूंमध्ये ३६ धाव केल्या आहेत तर भारताचा सध्याचा स्कोअर ८७ धावांवर २ बाद असा आहे . तसेच ईशान किशन सुद्धंबाद झाला असून श्रेयस ऐयार मोहीम सांभाळणार आहे .

Viral Video : नाव ‘दत्ता’ अधिकाऱ्यांने रेशन कार्डवर लिहलं ‘कुत्ता’ ; पीडित तरुणाने कुत्रा बनून अधिकाऱ्याला शिकवला धडा

Exit mobile version