भारतासाठी तिसरा दिवस ठरला कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे उत्तम प्रदर्शन

भारत-वेस्ट इंडिज (India-West Indies) यांच्यातील दुसरा कसोटी सामना (Second test match) पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात पावसामुळे काही षटकांचा (Overs) काही खेळ वाया गेला.

भारतासाठी तिसरा दिवस ठरला कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे उत्तम प्रदर्शन

भारत-वेस्ट इंडिज (India-West Indies) यांच्यातील दुसरा कसोटी सामना (Second test match) पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात पावसामुळे काही षटकांचा (Overs) काही खेळ वाया गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने पाच विकेटच्या मोबदल्यात २२९ धावांची मजल मारली. भारताकडे अद्याप २०९ धावांची आघाडी आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत तब्बल १०८ षटके फलंदाजी केली. काल दिवसभरात वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारताच्या अडचणी वाढवल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जेसन होल्डर (Jason Holder) आणि एलिक एथांजे (Elic Ethanje) खेळत होते. होल्डर ११ तर एलिक एथांजे ३७ धावांवर खेळत आहेत.

भारताने दिलेल्या ४३८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने संयमी सुरुवात केली. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट (Craig Braithwaite) याने संयमी फलंदाजी करत प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर ब्रेथवेट आणि मॅकेंजी (McKenzie) यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मुकेश कुमार (Mukesh Kumar) याने मॅकेंजी याला बाद करत भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. मुकेश कुमार याची कसोटीमधील ही पहिली विकेट होती. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार अर्धशतक (Half century) झळकावले. ब्रेथवेट याने ब्लॅकवूड (Blackwood) याच्यासोबत वेस्ट इंडिजचा डाव सावरत मोठ्या भागिदारीचा पाया रचला. अश्विन याने अचूक टप्प्यावर मारा करत वेस्ट इंडिजच्या कर्णधाराला तंबूत पाठवले. अश्विन याने फेकलेला चेंडू ब्रेथवेट याला समजलाच नाही, त्रिफाळा उडाला. ब्रेथवेट याने २३५ चेंडूचा सामना केला. ब्रेथवेट याने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली.

ब्रेथवेट बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजने ठराविक अंतराने विकेट फेकल्या. ब्लॅकवूड २० धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने ब्लॅकवूड याला तंबूत पाठवले. त्याने ९२ चेंडूचा सामना करताना दोन चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. रविंद्र जडेजाच्या चेंडूवर ब्लॅकवूडचा अजिंक्य रहाणे याने जबरदस्त झेल (Catch) घेतला, सोशल मीडियावर या झेलचे कौतुक होत आहे. ब्लॅकवूड बाद झाल्यानंतर लोकल हिरो जोशुआ डा सिल्वा (Joshua Da Silva) मैदानात आला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. जोशुआ डा सिल्वा याने २६ चेंडूत फक्त दहा धावा केल्या. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने जोशुआचा अडथळा दूर केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जेसन होल्डर आणि एलिक एथांजे खेळत होते. होल्डर ११ तर एलिक एथांजे ३७ धावांवर खेळत आहेत.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग ११ –

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन(यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिज संघाची संभाव्य प्लेइंग ११-

क्रेग ब्रॅथवेट(कर्णधार), टगेनरीन चंद्रपॉल, कर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथनाझे, जोशुआ दा सिल्वा(यष्टिरक्षक), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ,
केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पंतप्रधानांनी केले कौतुक

किरीट सोमय्याच्या प्रकरणावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Fitness Trainer Death, २१० किलो वजन उचलताना एका ३३ वर्षीय फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version