spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कॉमनवेल्थ गेम्समध्ये अचिंतनची सुवर्ण कामगिरी…

अचिंत शुलीने कमावलेले हे सुवर्णपदक भारताचे वेटलिफ्टिंगमधील तिसरे सुवर्णपदक

रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत युवा वेटलिफ्टिंग पटू अचिंत शुलीने विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसरे सुवर्णपदक कमावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या वीस वर्षीय खेळाडूंनी 73 किलो वजनी गटामध्ये 143 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेतील हा नवीन विक्रम ठरला आहे. शुली आधी युवा वेटलिफ्टींगपटू जेरेमी लालरिननुंगाने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले.

शुलीने स्नॅच प्रकारामध्ये १४३ किलो वजन उचललं. तर शुलिने क्लिन अँड जर्कमध्ये १७० किलोसहित एकूण ३१३ किलो वजन उचलले आहे. हा या स्पर्धेतील एक नवा विक्रम ठरला आहे. मलेशियाच्या ई हिदायत मोहम्मदला या स्पर्धेत रौप्य तर कॅनडाच्या शाद डारसिग्रीला कांस्य पदक मिळालं. मलेशियाच्या खेळाडून ३०३ किलो तर कॅनडाच्या खेळाडूने २९८ किलो वजन उचललं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन अंचितचं अभिनंदन केलं आहे. “अचिंतने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तो त्याचा शांत स्वभाव आणि दृढत निश्चयासाठी ओळखला जातो. या विशेष उपलब्धतेसाठी त्याने फार मेहनत घेतली आहे. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा,” असं मोदींनी म्हटलंय.

जेरेमी लालरिननुंगा (सुवर्ण), मीराबाई चानू (सुवर्ण), संकेत सरगर (रौप्यपदक), बिंद्याराणी देवी (रौप्यपदक) आणि गुरुराजा पुजारी (कांस्यपदक)यांच्यानंतर अचिंत शुलीने कमावलेले हे सुवर्णपदक भारताचे वेटलिफ्टिंगमधील तिसरे सुवर्णपदक तर एकूण पदकांपैकी सहावे पदक आहे.

Latest Posts

Don't Miss