Ravindra Jadeja वर करण्यात आली कारवाई, भारताच्या विजयी खेळामध्ये आयसीसीने टाकला मिठाचा खडा!

IND VS AUS - भारतीय संघाने पहिल्याच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) कसोटीत एक डाव खेळून १३२ धावांनी विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) या मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.

Ravindra Jadeja वर करण्यात आली कारवाई, भारताच्या विजयी खेळामध्ये आयसीसीने टाकला मिठाचा खडा!

IND VS AUS – भारतीय संघाने पहिल्याच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) कसोटीत एक डाव खेळून १३२ धावांनी विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) या मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंना १७७ धावांवर रोखून भारताने प्रत्युत्तरास ४०० धावांचा डोंगर उभा केला होता. भारताने रचलेला डोंगराचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फक्त ९१ धाव करता आल्या. भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने ३७ धाव देऊन ५ खेळाडू बाद केले. तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोघांनी २-२ खेळाडू बाद केले आणि अक्षर पटेल (Axer Patel) ने एक खेळाडू बाद केला.

नागपूर कसोटीत पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजाने चेंडू आणि बॅटने जबरदस्त खेळ दाखवला.पहिल्या डावात रवींद्र जडेजा ने ७० धावांचे योगदान केले आणि विजय देखील मिळवला या विजयादरम्यान भारतीय संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे भारताच्या या विजयी खेळामध्ये आयसीसीने(ICC) मिठाचा खडा टाकला आहे. पहिल्याच डावात पाच खेळाडू बाद करणाऱ्या जडेजावर ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने बॉल टॅम्परिंग(Ball tampering) म्हणजेच चेंडू कुरतडण्याचे आरोप लावले.

एक व्हिडीओ वायरल केला गेला आणि त्यात जडेजा बोटावर मलम लावून गोलंदाजी करत असल्याचा दावा करण्यात आला. रेफरींकडूनया व्हिडीओ ची भारताच्या संघासोबत आणि कर्णधार रोहित शर्मा(Captain Rohit Sharma)सोबत चर्चा करण्यात आली त्यांनी हे आरोप रद्द केले. परंतु जडेजाला आयसीसीने २५% रक्कम भरायला सांगितली आहे. जडेजाची हि पहिलीच चूक होती त्याने कलम २.२० चे उल्लंघन केले असे आयसीसीने सांगितले. हे जडेजाचे कृत्य खेळाच्या भावनांच्या विरुद्ध वर्तन दाखवण्याशी संबंधित आहे आणि हा गुन्हा औपचारिक सुनावयची गरज नाही असे आयसीसीने सांगितले.

हे ही वाचा : 

Legends League Cricket : इंडिया महाराजा संघाची धुरा सांभाळणार ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू

Bigg Boss 16, अखेर उद्या होणार बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version