spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव, तर शरद पवारांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्स राखून विजय मिळवलाय. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघाने भारतासमोर २० षटकात १४८ धावांचं लक्ष्य ठेवलं.

आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्स राखून विजय मिळवलाय. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघाने भारतासमोर २० षटकात १४८ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य १९.४ षटकांत पूर्ण केलं. भारताच्या या दमदार विजायायनंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने तुफानी खेळी खेळत शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. देशातील अनेक महानगरांमध्ये रस्त्यावर येऊन लोकांचा जल्लोष सुरु झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही या जल्लोषाचा मोह आवरला नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा शरद पवार यांनीही घरी बसून आनंद घेतला. हार्दीक पांड्याने शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. यावर शरद पवारांनी हात उंचावत जल्लोष साजरा केला. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे आपल्या नातवांसोबत टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरुन भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. टी-२० विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानने १० गडी राखून दारुण पराभव केला होता. त्याचा वचपा भारताने या सामन्यामध्ये काढला. या विजयानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केल्याचं मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “आजच्या आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय संघाने उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. भारतीय संघाने उत्तम कौशल्य आणि चिकाटी दाखवली. विजयाबद्दल त्याचं अभिनंदन,” असं मोदींनी म्हंटले आहे.

भारताच्या या दमदार विजयानंतर सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळाला. भारताच्या आशिया चषक स्पर्धेतील विजयानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख, कार्तिक आर्यन यांसह अर्जुन रामपाल या तिघांनीही भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यातील भारताच्या विजयी सलामीवर रितेश देशमुखने खास पद्धतीने एक ट्वीट केले आहे. यात त्याने हार्दिक पंड्यासह सर्व टीमला या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “हार्दिक पंड्या तुझे फार कौतुक. सामना छान रंगला आणि आपण विजयी ठरलो. खूपच छान. भारतीय संघाचे अभिनंदन. त्यासोबत पाकिस्तानचा संघही चांगला खेळला”, असे ट्वीट रितेश देशमुखने केले आहे. त्यासोबत त्याने #INDvsPAK या हॅशटॅगचाही वापर केला आहे.

 त्यासोबतच अभिनेता कार्तिक आर्यन यानेही इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या मागे भुलभुलेय्या २ या चित्रपटातील गाणेही पाहायला मिळत आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणाला, भारत-पाकिस्तान सामन्यात भारत जिंकावा अशी प्रार्थना मी दिवस रात्र करत असतो. त्यासोबत त्याने #HardikRoohBaba असा हॅशटॅग शेअर करत हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं ४६ चेंडूत ४९ धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा १२ तर, विराट कोहली ३५ धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी ५२ धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला ७ धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केले.

आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता. यानंतर २०१८ आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ८ गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात ९ विकेट्सने पराभव केला. यासह भारताने २०२१ च्या पराभवाचा बदला घेतला आहे.

 

हे ही वाचा:

यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी काही खास आमंत्रण पत्रिका

जाणून घ्या… हरतालिका उपवासाचे महत्व

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss