spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आणखी एक अटीतटीचा सामना; बांगलादेशच्या शेवटच्या चेंडूला झिम्बाब्वेविरुद्ध नो-बॉल…

टी-२० विश्वचषकात आज थरारक सामन्यात बांग्लादेशने झिम्बॉब्वेवर ३ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना अत्यंत रोमहर्षक स्थितीत पोहोचला होता. झिम्बॉब्वेला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. मात्र स्ट्राइकवर असलेल्या ब्लेसिंग मुजारबानी याला एकही धाव घेता आली नाही. यष्टीरक्षक नुरुल हसन याने मुजारबानीला यष्टीचित करत बांग्लादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे बांग्लादेशी खेळाडूंनी विजयाचं सेलिब्रेशन केलं आणि दोन्ही संघाचे खेळाडू मैदानाबाहेर गेले. मात्र अत्यंत अनपेक्षितरीत्या पंचांनी शेवटचा चेंडू नो बॉल घोषित करत सामन्यातील उत्सुकता वाढवला.

ब्रिस्बेनच्या (Brisbane) द गबा (The Gabba) स्टेडियमवर बांगलादेश आणि झिम्बाब्वे (Bangladesh vs Zimbabwe) यांच्यात आज सुपर-१२ फेरीतील सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात बांगलादेशच्या संघानं तीन धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर २० षटकात सात विकेट्स गमावून १५१ धावांचं लक्ष्य ठेवलं. बांगलादेशकडून सलामीला आलेल्या नजमुल हुसेन शांतोनं (Najmul Hossain Shanto) ५५ चेंडूत ७१ धावांची शानदार खेळी केली.बांग्लादेशच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघाला १४७ धावापर्यंत मजल मारता आली.

झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज असताना झिम्बाब्वेच्या नागारवाने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एक षटकार एक चौकार मारले. सामना दोन चेंडूत ५ धावा असा आला असताना शेवटचे षटक टाकणाऱ्या मोसादेक हुसैनने शेवटच्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. बांगलादेशला हुसैनने सामना जिंकून दिला असे चित्र निर्माण झाले असताना शेवटच्या चेंडूवर मात्र विकेटकिपरने स्टम्पिंग करताना चेंडू स्टम्पच्या पुढे पकडल्याने अंपायर रिव्ह्यूमध्ये हा नो बॉल देण्यात आला. दरम्यान, दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्ये पोहचले होते. त्यामुळे झिम्बाब्वेला शेवटच्या चेंडूवर (फ्री हिट) विजयासाठी ४ धावांची गरज होती. बांगलादेशला फक्त या चेंडूवर चौकार द्यायचा नव्हता. स्ट्राईकवर असलेला मुझारबानीने मिळालेली संधी दवडली. तो मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू हुकला आणि बांगलादेशने ३ धावांनी सामना जिंकला.

हे ही वाचा :

Saffron Project : नागपूरचा अजून एक प्रकल्प महाराष्ट्र बाहेर; सुप्रिया सुळेंसह आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

व्हिडीओ होतोय व्हायरल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss