अर्जुन तेंडुलकरचे रणजीमध्ये पदार्पण, पहिल्या दिवशी नाबाद फलंदाजी

अर्जुन तेंडुलकरचे रणजीमध्ये पदार्पण, पहिल्या दिवशी नाबाद फलंदाजी

अनेक दशकांपासून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखला जाणारा अनुभवी सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) मंगळवारी, १३ डिसेंबर रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गोवा रणजी संघातर्फे (Goa Ranji Team) तो राजस्थानविरुद्ध (Rajasthan) खेळत आहे. मास्टर ब्लास्टर या नावाने जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या सचिनने अगदी लहान वयातच रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अर्जुन हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, मुख्य फलंदाज म्हणून खेळणाऱ्या त्याच्या वडिलांच्या विपरीत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) अर्जुन तेंडुलकरला राज्य बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिन विपुल फडके म्हणाले, अर्जुन तेंडुलकरला आगामी हंगामात गोव्याकडून खेळायचे होते. त्यासाठी त्यांने संपर्क साधला. आम्ही यावर उत्तर देत आधी एमसीएकडून एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र द्या ज्यानंतर आम्ही तुमचे कौशल्य आणि फिटनेस तपासू, अशी माहिती फडके यांनी दिली. ज्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यावर अखेर अर्जूननं गोवा संघात पदार्पण केलं. दरम्यान आज रणजी क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळल्यामुळे अर्जुनसाठी आजचा दिवस नेहमीच अविस्मरणीय असणार आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान गोव्याची सुरुवात मात्र चांगली झालेली नाही. त्यांनी अवघ्या ३२ धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर सुमिरन आमोणकर ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर अमोघ देसाईने २७ धावा केल्या. सिद्धेश लाड १७ आणि एकनाथ केरकरने ३ धावा केल्या. त्याचवेळी स्नेहल कौथुणकरने ५९ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गोव्याने ५ गड्यांच्या मोबदल्यात २१० धावा केल्या होत्या. सुयश प्रभुदेसाई ८१ आणि अर्जुन तेंडुलकर ४ धावांवर नाबाद आहे. राजस्थानकडून अनिकेत चौधरीने सर्वाधिक दोन बळी घेतले आहेत. दरम्यान आता अर्जून फलंदाजीत आणि नंतर गोलंदाजीत काय कमाल करेल हे पाहावे लागेल.

हे ही वाचा : 

Bigg Boss16: साजिदने अब्दूच्या पाठीवर लिहिलेला संदेश पाहून नेटकरी संतापले, पहा नेमक काय झालं

पाटलांच्या शाईफेक प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version