अर्जुन तेंडुलकरची रणजित धमाकेदार एन्ट्री, रणजी पदार्पणातच ठोकले शतक

अर्जुन तेंडुलकरची रणजित धमाकेदार एन्ट्री, रणजी पदार्पणातच ठोकले शतक

अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात शतकी खेळी रचत सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मान अभिमानाने ताठ केली. गोव्याकडून (Goa) खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध (Rajasthan) पहिल्या डावात १७८ चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. अर्जुनने देखील सचिनप्रमाणेच आपल्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी केली. सचिनने १९८८ मध्ये गुजरातविरूद्ध हा कारनामा केला होता.

या शतकासोबतच अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांची बरोबरी केली. सचिनने सुद्धा १९८८ साली रणजी डेब्यु मॅचमध्ये शतक ठोकलं होतं. अर्जुन तेंडुलकर मागच्या सीजनपर्यंत मुंबई टीममध्ये (Mumbai team) होता. तिथे भरपूर कॉम्पिटिशन होती. संधी मिळत नव्हती. त्यानंतर अर्जुनने टीम बदलली. त्याने गोव्या टीमकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अखेर गोव्याच्या टीमकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरला नशिबाने साथ दिली.

गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. पहिल्या दिवशी राजस्थानने गोव्याचा निम्मा संघा गारद केला होता. मात्र दिवस संपत आला असताना सुयश प्रभुदेसाई आणि रणजी पदार्पण करणारा अर्जुन तेंडुलकर यांनी गोव्याचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अर्जुन तेंडुलकर १२ धावा करून नाबाद होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभुदेसाई आणि अर्जुनने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. प्रभुदेसाईने शतक ठोकले तर अर्जुनने लंचपर्यंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर अर्जुनने आक्रमक फलंदाजी करत १७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अर्जुन आणि सुयशने गोव्याचा डाव ५ बाद २०१ धावांपासून पुढे नेला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी रचत गोव्याला १४० षटकात ४१० धावांपर्यंत पोहचवले. सुयश प्रभुदेसाई हा द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे.

हे ही वाचा : 

युट्युब स्टार भुवन बाम आता OTT वर दिसणा , ‘ताझा खबर’ या सिरीजमधून करणार पदार्पण

सुषमा अंधारेंनी मागितली वारकऱ्यांची माफी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version