spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ट्विटरवर #ArrestKohli व्हायरल; नेटकऱ्यांकडून थेट विराट कोहलीला अटक करण्याची मागणी

विश्वचषक आता काही दिवसांवर आला असताना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याची मागणी केली जात आहे. #ArrestKohli हा हॅशटॅग सध्या ट्वीटरवर ट्रेन्ड होत असून यामागे तामिळनाडूच्या अरियालुर जिल्ह्यात घडलेली एक घटना कारणीभूत आहे. तामिळनाडूतील एका २४ वर्षीय मुलाने कोहली आणि आरसीबी संघाबद्दल अपशब्द वापरल्याने त्याच्याच २१ वर्षीय मित्राने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रोहित शर्माच्या फॅनच्या हत्येची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर कोहलीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. पी विघ्नेशची अरियालपूर जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. तो रोहित आणि मुंबई इंडियन्सचा चाहता आहे. ११ ऑक्टोबर रोजी धर्मराज आणि विघ्नेश सिडको इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गेले होते. येथे दोघांनी दारू पार्टी केली. या पार्टीदरम्यान दोघांमध्ये क्रिकेटबाबत वाद सुरू झाला. दरम्यान विघ्नेशने आरसीबीची खिल्ली उडवली. याचे धर्मराजला खूप वाईट वाटले आणि त्याने त्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून ठार केले. धर्मराजला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. यावेळी त्यांनी या सर्व गोष्टीला विराट कोहलीला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता विराट कोहलीला अटक करा, अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. ही गोष्ट घडली आहे ती तामिळनाडूमध्ये. पण या गोष्टीचे पडसाद आता संपूरण जगभरात उमटले आहेत. कारण सोशल मीडियावर आता #ArrestKohli हा ट्रेंड तयार झाला आहे आणि तो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

रोहितच्या चाहत्याच्या हत्येची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. ट्विटरवर काही लोकांनी कोहलीच्या अटकेची मागणी केली आहे. ‘अँरेस्ट कोहली’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागला आहे. एका चाहत्याने जर दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतला तर त्यामध्ये खरंच खेळाडूची चूक कशी असेल, असेही आता म्हटले जात आहे. चाहते हे कोणत्या थराला जातील, हे सांगता येत नाही. पण त्यासाठी ते ज्यांना आदर्श मानतात त्याला खेळाडूला अटक करण्यात काय तर्क आहे, हे मात्र अजूनही समजलेले नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलेली मागणी हे किती चुकीची आहे, हे आता समोर आले आहे.

हे ही वाचा :

Doctor G Box Office: आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ ने केली दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील नवं गाणं रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss