spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023 BAN vs AFG, बांगलादेशच्या ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

रविवारी (०३ सप्टेंबर) रोजी म्हणजेच काल आशिया चषक २०२३ चा (Asia Cup 2023 ) चौथा सामना बांगलादेश (Bangladesh) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात पाकिस्तानमधील (Pakistan) गद्दाफी क्रिकेट स्टेडियमवर (Gaddafi Cricket Stadium) खेळला गेला.

रविवारी (०३ सप्टेंबर) रोजी म्हणजेच काल आशिया चषक २०२३ चा (Asia Cup 2023 ) चौथा सामना बांगलादेश (Bangladesh) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात पाकिस्तानमधील (Pakistan) गद्दाफी क्रिकेट स्टेडियमवर (Gaddafi Cricket Stadium) खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानचा ८९ धावांनी पराभव करून बांगलादेशने सुपर-४ मध्ये जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने (Shakib Al Hasan) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेहंदी हसन मिराज (Mehndi Hasan Miraj) आणि शांतोच्या (Shanto) शतकी खेळीमुळे बांगलादेशने अफगाणिस्तानला ३३५ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २४५ धावांत सर्वबाद झाला.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचे फलंदाज मेहंदी हसन मिराज आणि नझमुल हुसेन शांतो यांनी शानदार फलंदाजी करत शतके झळकावली. मेहंदीने ११२ धावांची खेळी खेळली ज्यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र दुखापतग्रस्त होऊन तो मैदानातून परतला. यानंतर शांतोने शतक झळकावत १०४ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकार लगावले. याशिवाय कर्णधार शाकिब अल हसन ३२ धावा करून नाबाद परतला. मुशफिकुर रहीमने २५ आणि मोहम्मद नईमने २८ धावांचे योगदान दिले. या सर्व प्रकारामुळे संघाने ५ गडी गमावून ३३५ धावा केल्या. बांगलादेशच्या उत्कृष्ट फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. संघाकडून वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने (Taskin Ahmed) सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय शरीफुल इस्लामने (Shariful Islam) ३ तर हसन मेहमूद आणि मेहंदी हसन मिराज यांना १-१ असे यश मिळाले. इतर गोलंदाजांना यश मिळाले नाही.

३३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे फलंदाज इब्राहिम झद्रान (Ibrahim Zadran) आणि हशमतुल्ला शाहिदीच्या (Hashamtullah Shahidi) अर्धशतकांमुळेही संघाला विजय मिळवता आला नाही. या दोन फलंदाजांशिवाय अन्य कोणताही खेळाडू जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज केवळ १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मधल्या फळीतील फलंदाज रहमत शाह (३३) आणि नजीबुल्ला झदरन (१७) यांनाही विशेष धावा करता आल्या नाहीत. त्याचवेळी मोहम्मद नबी (०३) आणि गुलबदीन नायब (१५) स्वस्तात बाद झाले. खालची फळी एकापाठोपाठ एक झटपट पॅव्हेलियनमध्ये परतली. अफगाणिस्तान संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेला फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan), ज्याने जागतिक क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे, तो या सामन्यात संघासाठी सर्वात महागडा ठरला. त्याने गोलंदाजीच्या १० षटकात एकही विकेट न घेता ६६ धावा दिल्या. केवळ दोन अफगाण गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी झाले, ज्यात मुजीब उर रहमान (Mujeeb ur Rehman) आणि गुलबदिन नायब (Gulbadin Naib) यांचा समावेश होता. दोघांच्या खात्यात १-१ असे यश आले. इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.

हे ही वाचा: 

संजय राऊत यांचा भाजप पक्ष आणि इतर मित्रपक्षांना टोला…

जालन्यातील घटनेनंतर ‘या’ ठिकाणांहून सुटणाऱ्या सर्व एसटी बस रद्द…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss