Asia Cup 2023, बुमराह काल मायदेशी परतला अन् आज पत्नीनं दिली गोड बातमी…

आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) सुरू असताना टीम इंडियाला (Team India) मोठा धक्क बसला आहे.

Asia Cup 2023, बुमराह काल मायदेशी परतला अन् आज पत्नीनं दिली गोड बातमी…

आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) सुरू असताना टीम इंडियाला (Team India) मोठा धक्क बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मायदेशी परतला आहे. यॉर्कर किंग तडकाफडकी माघारी परतल्याने गेल्याने संघासाठी मोठा धक्का बसला आहे. बुमराह अचानक मायदेशी परतण्यामागे कारण आहे त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan). मागील अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखण्यामुळे मैदानापासून दूर असलेल्या बुमराहने आयर्लंड दौऱ्यामधून (Tours of Ireland) पुनरागमन केलं. विशेष म्हणजे थेट कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी खांद्यावर घेत बुमराहने भारताला मालिका जिंकवून दिली. बुमराह आणि संजनाच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. संजना गरोदर आहे. त्यामुळेच याचसंदर्भातील कारणामुळे बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला.

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी यंदाचं वर्ष फारच स्पेशल आहे. क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केल्यानंतर आता जसप्रीतच्या खासगी आयुष्यातही एक गोड गोष्ट घडली आहे. जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशनला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. आशिया चषक स्पर्धेमधून बुमराह तडकाफडकी रविवारी भारतात परला. यामागील कारणांबद्दल चर्चा सुरु असतानाच बुमराहने आपल्याला मुलगा झाल्याची घोषणा इन्स्टाग्रामवरुन (Instagram) केली आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन १५ मार्च २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले. संजना ही स्पोर्ट्स अँकर (Sports anchor) आहे.

बुमराह आणि संजना यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील बातम्या दिल्या आहेत. बुमराह पाकिस्तानविरुद्ध सुपर-४ मध्ये १० सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सामन्याआधी पुन्हा श्रीलंकेत परतणार आहे असंही समजल जात आहे. संजना ही स्पोर्ट्स अँकर आहे. एका कार्यक्रमादरम्यानच पहिल्यांदा तिची आणि बुमराहची भेट झाली होती. जसप्रीत बुमराह त्याच्या वैयक्तिक कारणासाठी परदेशी गेला आहे. मात्र इकडे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. बुमराहला एकही चेंडू न टाकता माघारी जावं लागलं आहे. सर्वांना आशा आहे की लवकरच परत मिशन आशिया कपसाठी परतेल.

आजच्या नेपाळविरुद्ध भारतीय संघ –

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

हे ही वाचा: 

Asia Cup 2023 IND vs NEP, आज भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये आमना – सामना, पहा दोन्ही संघाचे प्लेइंग ११…

पुणेकरांसाठी एक मोठी गुड न्यूज, ‘हा’ बहुचर्चित पूल होणार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version