Asia Cup 2023 IND Vs NEP, टीम इंडियाचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, शामीची संघात एन्ट्री…

भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी (Bowling) करण्याचा निर्णय घेतला आहे.

Asia Cup 2023 IND Vs NEP, टीम इंडियाचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, शामीची संघात एन्ट्री…

भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी (Bowling) करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात (Pakistan) प्रथम फलंदाजी केल्यामुळे दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे रोहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. पाकिस्तानविरोधात इशान किशन (Ishan Kishan) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी दमदार फलंदाजी केली, असे म्हणत रोहित शर्मा याने कौतुक केले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कौटंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, नेपाळचा (Nepal) कर्णधार रोहित पौडेल (Rohit Paudel) यानेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय नेपाळसाठी आजचा दिवस सर्वात मोठा असल्याचेही सांगितले. नेपाळच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे.

पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारताला एका गुणांवर समाधान मानावे लागले. आता आशिया चषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय गरजेचा आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ दोन गुणांसह सुपर ४ मध्ये प्रवेश करेल. जसप्रीत बुमराह उपलब्ध नसल्यामुळे रोहित शर्माने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) याला संधी दिली आहे. मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांच्या जोडीला हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर हे अष्टपैलू खेळाडू असतील. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव फिरकीची धुरा सांभाळतील.

पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये ४ सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल.

आशिया कपसाठी नेपाळ टीम –

रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.

आशिया कपसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

हे ही वाचा: 

ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रात एकूण दहा नवीन पोलीस ठाण्याच्या जागांसाठी वेगाने हालचाली सुरू…

Asia Cup 2023 BAN vs AFG, बांगलादेशच्या ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version