Asia Cup 2023 Ind vs Pak, आज होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला, पहा दोन्ही संघाचे प्लेइंग ११

आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये १० सप्टेंबर म्हणजेच आज भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) महामुकाबला पाहायला मिळणार आहे.

Asia Cup 2023 Ind vs Pak, आज होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला, पहा दोन्ही संघाचे प्लेइंग ११

आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये १० सप्टेंबर म्हणजेच आज भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) महामुकाबला पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेईंग ११ संघ जाहीर केला आहे. आशिया चषक २०२३ मध्ये रविवारी, १० सप्टेंबर रोजी टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ सुपर-४ मध्ये आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तान चार वेगवान गोलंदाजांसह (Fast Bowler) भारताविरोधात उतरणार आहे.

टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात पहिली वनडे मॅच ही १९७८ साली खेळवण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात एकूण १३३ वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तान टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने ७२ सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडिया ५५ सामने जिंकली आहे. तर ५ सामन्यांचा निकालच लागू शकला नाही. तर पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या १० सामन्यांमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने १० पैकी ७ वेळा बाजी मारली. तर पाकिस्तानला फक्त २ मॅचच जिंकता आल्यात. तर रद्द झालेला एकमेव सामना हा आशिया कप २०२३ साखळी फेरीतील आहे. हा सामना ०२ सप्टेंबर रोजी पावसाच्या व्यत्यामुळे रद्द करण्यात आला.

आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. पाकिस्ता-टीम इंडिया यांच्यात आशिया कप स्पर्धेत एकूण १४ ५० ओव्हरच्या सामने झाले आहेत. इथे टीम इंडियाने ७ वेळा विजयी झेंडा फडकवलाय. तर पाकिस्तानने ५ वेळा मैदान मारलंय. मात्र टीम इंडियाला याच मैदानात २००४ मध्ये पाकिस्तानने ५९ धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचा सुपर ४ मधील सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यावर पावसाचं सावट आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.

टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन (Pakistan Playing XI for the match against Team India)

बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया (Team India for the match against Pakistan)

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

हे ही वाचा: 

G20 summit, आज जी २० परिषदेचा दुसरा दिवस, सर्व राष्ट्रप्रमुख राजघाटावर…

WhatsApp New Feature, व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेला मेसेज आता सहज एडिट करता येणार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version