Asia Cup 2023 IND vs PAK, केएल राहुलचं जबरदस्त कमबॅक, पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी…

आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेतल्या सुपर ४ फेरीचा सामना भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सुरु आहे.

Asia Cup 2023 IND vs PAK, केएल राहुलचं जबरदस्त कमबॅक, पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी…

आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेतल्या सुपर ४ फेरीचा सामना भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा (Bowling) निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांनी हा निर्णय फोल ठरवला. आघाडीच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. सहा महिन्यानंतर संघात पदार्पण करत केएल राहुल (KL Rahul) याने जबरदस्त कामगिरी केली आहे. अवघ्या ६० चेंडूत अर्धशतक झळकावलं. यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याच्या या खेळामुळे भारतीय संघाचं टेन्शन दूर झालं आहे. तसेच वनडे वर्ल्डकप (ODI World Cup) संघात केलेली निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकाची मोठी समस्या होती. मात्र आता केएल राहुल याच्या कमबॅकमुळे प्रश्न सुटणार आहे.

तिसऱ्या गड्यासाठी केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या १६३ धावांची पार्टनरशिप अवघ्या १५७ चेंडूत झाली आहे. पाकिस्तानी गोलंदाजांना नेमका कुठे चेंडू टाकावा अशा प्रश्न पडला आहे. कारण दोन्ही खेळाडू आक्रमकपणे गोलंदाजांचा सामना करत आहेत. त्यात दुखापतीमुळे हारिस रउफ (Harris Rauf) बाहेर असल्याने एक गोलंदाज पाकिस्तानला शॉर्ट पडत आहे. केएल राहुलच्या सोबतीला विराट कोहलीसुद्धा फॉर्ममध्ये दिसत आहे. दोघही अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. सध्या केएल राहुल ९४ चेंडूत ९० धावा आणि विराट कोहली हा ७३ चेंडूत ८३ धावा करत बॅटिंग करत आहेत.

पाकिस्तानचा गोलंदाजी अटॅक चांगला आहे. पण भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी अर्धशतकं (Half a century) झळकावली आहेत. त्यामुळे ३०० धावांचा टप्पा टीम इंडिया गाठेल असंच चित्र आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवरील भार हलका होणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन (Team India Playing XI)

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन (Pakistan Playing XI)

बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.

हे ही वाचा: 

पुण्यातून अमित ठाकरे त्यांची जबाबदारी पार पाडणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भीमाशंकराकडे प्रार्थना…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version