Asia Cup 2023 IND vs PAK, शाहिन आफ्रिदीने विराट-रोहित दोघांनाही केले बाद, भारताची खराब सुरुवात…

पाकिस्तानविरोधात (Pakistan) टीम इंडियाची (India) सुरुवात निराशाजनक झाली. शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या अनुभवी फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडत भारतीयांचा हिरमोड केला.

Asia Cup 2023 IND vs PAK, शाहिन आफ्रिदीने विराट-रोहित दोघांनाही केले बाद, भारताची खराब सुरुवात…

पाकिस्तानविरोधात (Pakistan) टीम इंडियाची (India) सुरुवात निराशाजनक झाली. शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या अनुभवी फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडत भारतीयांचा हिरमोड केला. शाहिन आफिर्दीच्या भेदक माऱ्यापुढे विराट आणि रोहितच्या दांड्या गुल झाल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वारंवार पावसाचा (rain) व्यत्यय येत असतानाच शाहिन आफ्रिदीने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दोघेही संयमी फलंदाजी करत होते. पाचवे षटक सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदी याने रोहित शर्माला त्रिफाळाचीत बाद करत भारता मोठा धक्का दिला. पहिल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरणार त्याआधीच शाहिन याने दुसरा धक्का दिला. शाहिन आफ्रिदीने विराट कोहली यालाही त्रिफाळाचीत बाद करत १४० कोटी भारतीयांचा हिरमोड केला.

रोहित शर्मा याने २२ चेंडूत ११ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. तर विराट कोहली याने एका चौकाराच्या मदतीने चार धावा केल्या. रोहित आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहिन आफ्रिदी याने तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने डावाची सुत्रे हातात घेतली. अय्यर याने दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. श्रेयस अय्यर आणि गिल भारताचा डाव सावरतील, असे वाटत होते. पण हॅरिस रौफ (Harris Rauff) याने श्रेयस अय्यर याला फखर जमान (Fakhr Zaman) याच्याकरवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस अय्यर याने ०९ चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने १४ धावांचे योगदान दिले.

एकीकडे विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला युवा शुभमन गिल संयमी फलंदाजी करत होता. परंतु पुन्हा एकदा हॅरिस रौफ याने शुभमन गिलला त्रिफाळाचीत बाद केले. शुभमन गिलकडून भारतीय फॅन्सला मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु शुभमन गिल त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. शुभमन गिल याने ३२ चेंडूत १० धावा केल्या. आता हार्दिक पंड्या फलंदाजी करत आहे. पंड्या आणि इशान किशन या फलंदाजांच्या हातात भारतीय संघाची धुरा आहे. इशान किशन हा ४१ चेंडूत ४० धावा करत अतिशय संयमी आणि उत्कृष्ट फलंदाजी करत आहे, तर हार्दिक पंड्या हा २० चेंडूत २२ धावा करत फलंदाजी करत आहे. हे दोन फलंदाज कशी कामिगिरी करतात त्यावर भारतीय संघाची धावसंख्या अवलंबून आहे.

हे ही वाचा: 

जालन्यातील निर्दोष मराठी बांधवांवर सरकारच्या आदेशानेच लाठीचार्ज, नाना पटोले

पुण्यात नेमकं चाललंय काय?, तरुणाची दगडाने ठेचून करण्यात आली हत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version