spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ASIA CUP 2023, आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग ११

आशिया चषक २०२३ (ASIA CUP 2023) स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळला जाणार आहे.

आशिया चषक २०२३ (ASIA CUP 2023) स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करुन सज्ज झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान संघातील सामना कँडी (Candy) येथे खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी म्हणजेच आज दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. तत्पुर्वी पाकिस्तान संघाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. टीम इंडिया आपली प्लेइंग इलेव्हन नाणेफेकीपूर्वी कधीही जाहीर करु शकतो. त्याआधी संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घेऊया.

भारतीय संघात लोकेश राहुलशिवाय (KL Rahul) इशान किशन (Ishaan Kishan) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना यष्टिरक्षक (wicket keeper) म्हणून संधी देण्यात आली आहे. सॅमसन राखीव खेळाडू म्हणून संघासोबत आहे. अशा स्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षकाच्या स्थानाबाबत साशंकता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन सामन्यांत अर्धशतकं झळकावल्यानंतर इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याने डावाची सुरुवात करताना तिन्ही अर्धशतके झळकावली असून सध्याच्या संघात रोहित शर्मा शुबमन गिलसह डावाची सुरुवात करेल. विराट तिसऱ्या क्रमांकावर आणि अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत पाचव्या क्रमांकाची जागा यष्टिरक्षकासाठी रिक्त आहे. हार्दिकला पाचव्या क्रमांकावर पाठवून कर्णधार रोहितही यष्टीरक्षकाला सहा किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी खेळवू शकतो. कारण रवींद्र जडेजालाही सहा किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवता येऊ शकते. अशा परिस्थितीत सॅमसनची संघात निवड केली जाऊ शकते, कारण तो शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारू शकतो. टी-२० मध्येही त्याचा असाच वापर झाला. त्याचवेळी किशनची संघात निवड झाल्यास त्याला डावाची सुरुवात करता येईल. या स्थितीत रोहित किंवा गिल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतात. कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक द्रविड यांच्यासाठी हा निर्णय खूपच कठीण असेल. इशान पाचव्या क्रमांकावरही खेळू शकतो, मात्र तो याआधी वनडे खेळलेला नाही. त्याचवेळी मधल्या फळीतही त्याचा विक्रम अगदी सामान्य आहे.

आशियाई खेळपट्ट्या लक्षात घेऊन संघात हार्दिकसोबत तीन वेगवान गोलंदाजांची निवड करायची की तीन फिरकी गोलंदाजांसह जायचे हेही भारतीय संघाला ठरवावे लागेल. जर रोहित दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला तर हार्दिक तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची षटके टाकू शकेल आणि तीन फिरकी गोलंदाज मधल्या षटके टाकतील. मात्र, या स्थितीत शमी, बुमराह आणि सिराजमध्ये कोणाला वगळावे. हा एक आव्हानात्मक निर्णय असेल. बुमराह हा देशातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे, शमी सर्वात अनुभवी आहे आणि सिराज आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजांमध्ये खेळतील हे निश्चित आहे. तिसऱ्या फिरकीपटूला संधी मिळाल्यास अक्षर पटेलचाही संघात समावेश होऊ शकतो.

भारतीय संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Indian Team Probable Playing XI) –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

हे ही वाचा: 

औरंगाबादमध्ये उमटले जालन्यातील घटनेचे पडसाद

राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला? घ्या सविस्तर जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss