Asia Cup 2023, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत विजय, नेपाळचा २३८ धावांनी पराभव…

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट टीमने आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे.

Asia Cup 2023, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत विजय, नेपाळचा २३८ धावांनी पराभव…

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट टीमने आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानने विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने नेपाळवर (Nepal) २३८ धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानने नेपाळला ३४३ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र नेपाळचा बाजार पाकिस्तानच्या भेदक आणि धारधार गोलंदाजीसमोर २३.४ ओव्हरमध्येच आटोपला. नेपाळने २३.४ ओव्हरमध्ये १०४ धावाच करता आल्या. कॅप्टन बाबर आझम (Babar Azam), इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) आणि शादाब खान (Shadab Khan) ही तिकडी पाकिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अवघ्या २५ धावांवर दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि दीडशतक ठोकले. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्यासोबत बाबर आझम याने ८६ धावांची भागिदारी केली. मोहम्मद रिझवान ४४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आगा सलमानही (Agha Salman) स्वस्तात तंबूत परतला. एका बाजूला विकेट पडत असताना बाबरने दुसऱ्या बाजूने दमदार फलंदाजी सुरुच ठेवली होती. बाबर आझम याने इफ्तिखार अहमद याच्या साथीने पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. पाचव्या विकेटसाठी बाबर आणि इफ्तिखार यांनी १३४ चेंडूमध्ये २१४ धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने ३०० धावांचा पल्ला पार केला. इफ्तिखार अहमद याने अवघ्या ७१ चेंडूमध्ये १०९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ षटकार आणि ११ चौकार ठोकले. बाबर आझम याने १३१ चेंडूत १५१ धावांची खेळी केली. यामध्ये १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. नेपाळकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. सोमपाल कामी (sompal kami) याने सर्वाधिक २८ धावा केल्या. आरिफ शेख (Arif Shaikh) २६ धावा करुन माघारी परतला. तर गुलशन झा ने (Gulshan Jha) १३ धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त दोघांना खातेही उघडता आले नाही. तर ५ जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर करण केसी (Karan KC) ०७ धावांवर नाबाद परतला. पाकिस्तानकडून शादाब खान याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदी आणि हरीस रौफ या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर नसीम शाह आणि मोहम्मद नवाझ या दोघांच्या खात्यात १-१ विकेट गेली.

दरम्यान पाकिस्तानचा वनडे क्रिकेटमधील (ODI Cricket) तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. पाकिस्तानने १८ ऑगस्ट २०१६ रोजी आयर्लंड विरुद्ध २५५ धावांनी विजय मिळवला होता. तर त्यानंतर २० जुलै २०१८ रोजी पाकिस्तानने झिंब्बावेचा (Zimbabwe) २४४ धावांनी खुर्दा उडवला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने नेपाळला २३८ धावांनी धुळ चारली आहे. पाकिस्तानचा पुढील सामना हा ०२ सप्टेंबरला टीम इंडिया (India) विरुद्ध होणार आहे.

हे ही वाचा: 

सोमेश्वर कारखान्यापेक्षा माळेगावचा कारखाना देईल अधिक दर, अजित पवारांचा शब्द ठरला खरा…

अदानी समूह पुन्हा अडचणीच्या विळख्यात …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version