Asia Cup 2023 SL vs BAN Super 4, श्रीलंकेचा बांगलादेशवर दणदणीत विजय, बांगलादेशचा आशिया कपमधून पत्ता कट

आशिया कप २०२३ सुपर ४ (Asia Cup 2023 Super 4) मधील रंगतदार झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट टीमने बांगलादेशवर (Bangladesh) २१ धावांनी विजय मिळवला आहे.

Asia Cup 2023 SL vs BAN Super 4, श्रीलंकेचा बांगलादेशवर दणदणीत विजय, बांगलादेशचा आशिया कपमधून पत्ता कट

आशिया कप २०२३ सुपर ४ (Asia Cup 2023 Super 4) मधील रंगतदार झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट टीमने बांगलादेशवर (Bangladesh) २१ धावांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेने बांगलादेशला विजयासाठी २५८ धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशनेही अखेरपर्यंत चांगली झुंज दिली. तॉहीद हृदाय (Towhid Hridoy) याने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. मात्र श्रीलंकेच्या महीश थेक्षणा (Mahesh Thekshana), दासून शनाका (Dasun Shanaka) आणि मथीशा पथीराणा (Mathisha Pathirana) या तिघांनी बांगलादेशला ४८.१ ओव्हरमध्ये २३६ धावांवर गुंडाळलं. श्रीलंकेने या विजयासह सुपर ४ मध्ये विजयी सुरुवात केली. तर बांगलादेशचा सुपर ४ राऊंडमधील सलग दुसरा पराभव ठरला. तसेच श्रीलंकेचा हा सलग १३ वनडे विजय ठरलाय. सोबतच श्रीलंकेने १३ वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करण्याचा कीर्तीमान केलाय.

बांगलादेशची २५८ धावांचं पाठलाग करताना दमदार सुरुवात झाली. मोहम्मद नईम (Mohammad Naeem) आणि मेहदी हसन मिराज (Mehdi Hasan Miraj) या दोघांनी ५५ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर मेहदी हसन हा २८ धावा करुन तंबूत परतला. इथून विकेट पडण्याची सुरुवात झाली. मोहम्मद नईम २१, कॅप्टन शाकिब अल हसन ३ आणि लिटॉन दास याने १५ धावा केल्या. त्यानंतर मुशफिकर रहीम आणि तॉहीद हृदॉय या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. मुशफिकीर रहीम २९ धावांवर आऊट झाला. मात्र त्यानंतर तॉहीदने शेपटीच्या खेळाडूंना हाताशी घेत किल्ला लढवला. तॉहीदने बांगलादेशला सामन्यात कायम ठेवलं. या दरम्यान शमीम होसैन ५ धावांवर आऊट झाला. त्यानंतर बांगलादेशची अखेरची आशा असेलला तॉहीदही आऊट झाला. तॉहीदने ९७ बॉलमध्ये १ सिक्स ७ फोरच्या मदतीने ८२ धावा केल्या. तॉहीदनंतर तास्किन अहमद १ आणि शोरिफूल इस्लाम ८ रन्सवर आऊट झाला. इस्लाम आऊट झाल्याने बांगलादेशची ४६.१ ओव्हरमध्ये ९ बाद २१६ अशी स्थिती झाली.

त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमा याने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. पाथून निसांका याने ४० धावांच योगदान दिलं. कुसल मेंडिस याने अर्धशतक झळकावलं. कॅप्टन दासून शनाका याने २४ धावा केल्या. करुणारत्ने याने १८ आणि असलंका याने १० रन्स केल्या. कसुन राजिथा याने नाबाद १ धाव केली. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अशा प्रकारे श्रीलंकेने ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून २५७ धावा केल्या. बांगलादेशकडून तास्किन अहमद आणि हसन महमूद याने प्रत्येकी ३-३ जणांचा काटा काढला. तर शोरिफूल इस्लाम याने २ विकेट्स घेतल्या. दरम्यान सुपर ४ मधील तिसऱ्या सामन्यात १० सप्टेंबर म्हणजेच आज पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना रंगणार आहे.

हे ही वाचा: 

Asia Cup 2023 Ind vs Pak, आज होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला, पहा दोन्ही संघाचे प्लेइंग ११ G20 summit, आज जी २० परिषदेचा दुसरा दिवस, सर्व राष्ट्रप्रमुख राजघाटावर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version