spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Asia Cup 2023, श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट्सने विजय…

बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी १६५ धावांचं आव्हान दिलं होतं.

श्रीलंकेने (Sri Lanka) आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) मध्ये विजयी सुरुवात केली आहे. श्रीलंका क्रिकेट टीमने बांगलादेशवर (Bangladesh) ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी १६५ धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३९ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बांगलादेश पराभूत झाली असली तरी त्यांच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला सुरुवातीला झटपट झटके दिले. तसेच बांगलादेशने श्रीलंकेला सहजासहजी जिंकू दिलं नाही, त्यासाठी चांगलीच लढाई दिली. १६५ धावांसाठी श्रीलंकेला ३९ ओव्हरपर्यंत खेळायला भाग पाडलं.

श्रीलंकेने ४३ धावांच्या मोबदल्यात पहिले ३ विकेट्स गमावले. दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने ०१, पाथुम निशांका (Pathum Nishanka) याने १४ आणि कुसल मेंडिल (Kusal Mendil) ०५ धावांवर आऊट झाले. मात्र त्यानंतर सदीरा समरविक्रमा (Sadira Samaravikrama) आणि चरिथा असलंका (Charitha Aslanka) या दोघांनी विजयाचा पाया रचला आणि श्रीलंकेचा विजय निश्चित केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. या दरम्यान सदीराने अर्धशतक (half century) पूर्ण केलं. मात्र श्रीलंकेचा स्कोअर १२१ असताना सदीरा ५४ धावांवर आऊट झाला. त्यानंतर आलेला धनंजया डी सीलव्हा (Dhananjaya D Sealva) स्वस्तात माघारी परतला. धनंजया याने ०२ धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन दासुन शनाका (Dasun Shanaka) आणि चरिथा असलंका या दोघांनी श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं.

दासून शनाका याने नाबाद १४ धावांची खेळी केली. चरिथा असलंका याने ९२ बॉलमध्ये ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. चरिथा खऱ्या अर्थाने श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. तसेच बांगलादेशकडून कॅप्टन शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने २ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तास्किन अहमद (Taskin Ahmed), शोरिफूल इस्लाम (Shoriful Islam) आणि मेहदी हसन (Mehdi Hasan) या तिघांनी १-१ विकेट घेतली. श्रीलंकेने या विजयासह १० वर्षांपूर्वीचा बदला घेतला. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका २०१३ साली याच स्टेडियमवर आमनेसामने होते. तेव्हा बांगलादेशने श्रीलंकेचा ३ विकेट्सने पराभव केला होता.

श्रीलंका प्लेईंग इलेव्हन (Sri Lanka Playing XI) –

दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन (Bangladesh Playing XI) –

शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

हे ही वाचा: 

गौतमी पाटीलच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉस नंतरची ‘दिल दोस्ती दिवानगी’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss