Thursday, July 4, 2024

Latest Posts

India-Pak Match ला उपस्थिती आणि आज निधन, MCA चा अध्यक्ष हरपला

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने अमेरिकेत निधन झाले आहे. अमोल काळे हे ४७ वर्षांचे होते. महत्वाकांक्षी अमोल काळेंच्या निधनाने क्रिकेट, राजकारण आणि प्रशासकीय वर्तुळाला जबर धक्का बसला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले अमोल काळे यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. मूळचे नागपूरचे असणारे अमोल काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. अमोल काळे हे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे सहप्रवर्तक होते. या घटनेमुळे क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. याबाबत राजकीय विश्वातील नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

या दुःखातून सावरण्यासाठी बळ लाभो

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही बातमी अतिशय दुःख देणारी असून त्यांच्या निधनाने मुंबईच्या क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ लाभो हीच प्रार्थना. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उत्तम संघटक आणि क्रिकेटप्रेमी

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकली. उत्तम संघटक आणि क्रिकेटप्रेमी. अमोल हे जगाचा निरोप घेण्याचे वय नव्हते हे माझे वैयक्तिक नुकसान असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

एक खिलाडू वृत्तीचा मित्र गमावला

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनामुळे एक खिलाडू वृत्तीचा मित्र मी गमावला. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

आकस्मिक निधनाचे वृत अत्यंत दुःखद

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे जी यांचे अमेरिकेत आकस्मिक निधनाचे वृत अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. काळे कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो ही प्रार्थना, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी अभिवादन केले.

क्रिकेट विश्वाची अपरिमित हानी

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी अमोल काळे यांना आदरांजली वाहिली आहे.

हे ही वाचा:

या ‘पाच’ कारणांमुळे PM Narendra Modi पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान

NARENDRA MODI OATH TAKING CEREMONY : मोदींच्या पाठोपाठ घेतली ‘यांनी’ शपथ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss