AUS vs IND: केएल राहुलने चौकार आणि षटकारांच्या जोरावर ३३ चेंडूत ५७ धावा केल्या

AUS vs IND: केएल राहुलने चौकार आणि षटकारांच्या जोरावर ३३ चेंडूत ५७ धावा केल्या

भारताचा सलामीवीर केएल राहुल आणि सूर्याकुमार यादवच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर १८७ धावांचं लक्ष्य ठेवलं. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे सुरु असलेल्या सराव सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघानं टी-२० विश्वचषकाची तयारी कशी केलीय? हे या सामन्यातून स्पष्ट होईल. भारताच्या पहिल्या सराव सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं मोहम्मद शामीला विश्रांती दिलीय. दरम्यान, वेगवान गोलंदाज हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह भारताच्या गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील.

हेही वाचा : 

Mhada Lottery : म्हाडाच्या लॉटरीसाठी दिवाळीचा मुहूर्त हुकणार !

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने मैदानात येताच धावा काढण्यास सुरुवात केली. केएल राहुलने येताच चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याची लय पाहून रोहित शर्माने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची जबाबदारी घेतली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकात ७८ धावांची भागीदारी झाली. या एकूण धावसंख्येवर केएल राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. भारतीय फलंदाजांमध्ये केएल राहुलशिवाय सूर्यकुमार यादवनेही तुफानी खेळी खेळली.

https://twitter.com/BCCI/status/1581882458932666369?t=MgbwjNPCk1iS1_ZZLt3V2g&s=19

Gram Panchayat Election Results 2022 : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, सर्व अपडेट्स…

पहिल्या सहा षटकात भारतानं एकही विकेट न गमावता ७० धावा केल्या. या सामन्यातील पावरप्लेमध्ये भारताचं पारडं जड दिसलं. मात्र, पुढच्या चार षटकांत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पुनरागमन केलं. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टन अगर यांनी अनुक्रमे केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना बाद करून भारताला दोन धक्के दिले. भारतानं १० षटकात दोन विकेट्स गमावून ८९ धावा केल्या. पुढच्या पाच षटकात भारतानं ४९ धावा लुटल्या. परंतु, विराट कोहली (१९ धावा) आणि हार्दिक पांड्याची (२ धावा) विकेट्स गमावली. अखेरच्या पाच षटकात भारतानं ४८ धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघानं निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १८६ धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवनं ३२ चेंडूत अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मिचेश स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टर अगरच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.

अजित पवार पुन्हा टार्गेटवर ! ईडीकडून चौकशी होणार?

Exit mobile version