T- 20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल

T- 20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल

आशिया कप नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया टी २० सामना रंगणार आहे. टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिके खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (India vs Australia) भारतात दाखल झालाय. उद्या ऑस्ट्रेलिया संघ त्यांच्या सरावाला सुरवात करणार आहे. भारत संघ सुद्धा उद्या मोहाली साठी रवाना होणार आहे. मोहाली मध्ये पोचताच भारत संघ सुद्धा आपल्या सरावला सुरवात करणार आहे. भारताविरुद्ध टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियानं तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिलीय. तर, मिचेश मार्श, मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉयनिस दुखापतीमुळं संघाबाहेर झाले आहेत.

काही महिनयांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकाची तयारी या सामान्य पासून सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका त्यांच्या तयारीची कसोटी पाहण्याची उत्तम संधी असेल. दुखापतीमुळं आशिया चषकाला मुकलेल्या भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलनं सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्व जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या फॅन्स मध्ये खेळ पाहण्यासाठी मोठी उत्सुकता आहे.

अभिनेता अजय देवगणची मोठी घोषणा

विश्वचषक २०२२ च्या ऑस्ट्रेलिया संघा मध्ये डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, अॅडम झम्पा, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार) यांचा समावेश आहे.

Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

भारतात विश्वचषक 2022च्या संघाची सुद्धा घोषणा झाली आहे. या मध्ये रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

माश्यासोबत सेल्फी घेणं पडलं महाग ! मजेशीर व्हिडिओ होतोय वायरल

SCO शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानला रवाना होणार

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास आता महागणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version