spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू केली, वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार अ‍ॅरॉन फिंच (Aaron Finch) गेल्या काही दिवसांपासून खराब खेळीचा सामना करताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार अ‍ॅरॉन फिंच (Aaron Finch) गेल्या काही दिवसांपासून खराब खेळीचा सामना करताना दिसत आहे. वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी फिंच काही दिवसांपासून झगडत आहे. या दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा नामांकित व दिग्गज खेळाडू अशी ओळख असलेला अ‍ॅरॉन फिंच हा एक दिवसीय खेळापासून निवृत्ती घेण्यात येणार आहे. शनिवारी न्युझीलँडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामना हा अ‍ॅरॉन फिंचचा शेवटचा सामना असेल.

काही दिवसांपासून अ‍ॅरॉन फिंचची कामगिरी हि चांगली दिसून येत नसल्याने त्याने हा मोठा निर्णय घेतल्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. या अचानक निवृतीच्या घोषणेनंतर अ‍ॅरॉन फिंचच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आशिया कप आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूने निवृत्त झाल्याची चर्चा सगळीकडेच मोठ्या प्रमाणात होत आहे. काही दिवसांपासून आरोन फिंचची फलंदाजी चांगली होत नसल्याले अनेक चाहत्यांनमध्ये प्रचंड प्रमाणत नाराजी होती.

 अ‍ॅरॉन फिंच खराब फॉर्मचा सामना करत आहे. फिंचने यावर्षी १३ एकदिवसीय डावात केवळ १३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. हा खेळाडू ५ वेळा शून्यावर बाद झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अ‍ॅरॉन फिंच शून्यावर बाद झाला आणि यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. फिंच एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शुन्यावर बाद होणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे. त्याने आता पर्यंत त्याच्या कारकीर्द १४५ सामने घेले आहेत.त्या मध्ये ५४०१ धावा केल्या हेत आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे त्याने आता पर्यंत १७ शतके झळकावली आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्धीपत्रकात फिंच म्हणाला, “काही अविश्वसनीय आठवणींसह ही एक विलक्षण राइड होती.” मला मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक लोकांनी मदत केली त्या सर्व लोकांचे मी आभार मानतो असं भावूक ट्विट अ‍ॅरॉन फिंचने केलं आहे.

पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधार पद अ‍ॅरॉन फिंचकडे सोपवण्यात आलं आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. याशिवाय २०२० मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाचा ‘मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला आहे.

हे ही वाचा:

मोठी बातमी ! आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार

बडा कब्रस्तान प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर निशाणा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो समोर आणत सेनेचा पलटवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss