IND vs NZ दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, बीसीसीआयने केली मोठी कारवाई

हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

IND vs NZ दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, बीसीसीआयने केली मोठी कारवाई

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शनिवार, २१ जानेवारी रोजी रायपूर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ रायपूरला पोहोचले आहेत, मात्र दुसरा सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. खरं तर, हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफरीचे जवागल श्रीनाथ यांनी हा दंड ठोठावला आहे. बुधवारी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला निर्धारित वेळेत टाकायच्या षटकांमध्ये भारतीय संघ तीन षटके मागे असल्याचे आढळले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, “खेळाडू आणि समर्थन कर्मचार्‍यांच्या उल्लंघनाशी संबंधित ICC आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार संघ निर्धारित वेळेत गोलंदाजी करू शकले नसल्यामुळे प्रत्येक षटकासाठी खेळाडूंचे सामना शुल्क. २० टक्के (तीन षटकात ६० टक्के) दंड आकारण्यात आला आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने उल्लंघनासाठी दंड स्वीकारला आहे, त्यामुळे अधिकृत सुनावणीची आवश्यकता नाही. मैदानावरील पंच अनिल चौधरी आणि नितीन मेनन, तिसरे पंच केएन अनंतपद्मनाभन आणि चौथे पंच जयरामन मदनगोपाल यांनी आरोप हे मांडले आहेत. या सामन्यात शुभमन गिलच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर भारताने १२ धावांनी विजय नोंदवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. २३ वर्षाचा शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. याबाबतीत त्याने इशान किशनला देखील मागे टाकले आहे. ज्याने अलीकडेच डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध २१० धावा केल्या होत्या.

हे ही वाचा:

MPSCकडून मेगा भरती घोषणा, तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती

डीजीसीएने केली मोठी कारवाई, एअर इंडियाला ३० लाखांचा दंड तर पायलटचा परवानाही केला रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version