बॅडमिंटनपटू Saina Nehwal निवृत्तीच्या तयारीत; ‘या’ आजाराने त्रस्त, फक्त दोन तासांचा सराव आणि…

बॅडमिंटनपटू Saina Nehwal निवृत्तीच्या तयारीत; ‘या’ आजाराने त्रस्त, फक्त दोन तासांचा सराव आणि…

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सध्या संधिवाताच्या त्रासाने ग्रासली आहे. तिने स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे. या संधिवाताच्या आजारामुळे वर्षाअखेरीस निवृत्ती जाहीर करण्याचा विचार करत सायना नेहवाल करत असल्याची माहिती तिने  दिली आहे. सायना नेहवाल ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. याशिवाय सायनाने 2010 आणि 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) ने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर कोरले आहे.

काय म्हणाली सायना नेहवाल? 

सायना नेहवाल (Saina Nehwal) ने सांगितले की, मला खेळणे अवघड झाले आहे. माझी कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. सध्या गुडघ्याची स्थिती चांगली नाही, संधिवाताचा त्रास सुरू आहे. त्यामुळे मला सात ते आठ तास  सरावात गुंतून राहणे शक्य होत नाही. विजय मिळवण्यासाठी फक्त दोन तासांचा सराव पुरेसा नसतो. त्यामुळे मी निवृत्तीचा विचार करत आहे. निवृत्तीचा काय परिणाम होईल हे देखील एक प्रकारचे आव्हान असणार आहे, अशी माहिती सायनाने दिली आहे. खेळाडूची कारकीर्द फार छोटी असते. मी वयाच्या नवव्या वर्षी पोर्टवर आले. पुढच्या वर्षी मी 35 वर्षांची होईन, माझी कारकीर्द लांबलचक राहिली याचा मला गर्व आहे. जे काही मिळवलं आहे, त्याविषयी आनंद आहे. वर्षाअखेरपर्यंत दुखापतींचे आकलन करावे लागणार आहे. ऑलम्पिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी तीन ऑलम्पिक खेळले पण सलग दोन ऑलम्पिकला मुकले याची खंत आहे. मी जे सामने खेळले त्यात शंभर टक्के योगदान दिल्याचा मला आनंद आहे.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

सायनाने हैदराबादच्या एलबी स्टेडियम मधून बॅडमिंटनची ट्रेनिंग घेतली. तिने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त एसएम आरिफ यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे घेतले. 2010 मध्ये राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार तसेच पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सायना नेहवालला सन्मानित करण्यात आले होते. पण आता शारीरिक बाबींमुळे सायनाला खेळणे कठीण होत आहे आणि त्यामुळेच तिने निवृत्तीचा निर्णय घेण्याचा विचार केला आहे.

हे ही वाचा:

Lalbaug Bus Accident: अपघातामुळे लग्नाचे स्वप्न भंगले, होणाऱ्या नवऱ्यासमोर मृत्यूने कवटाळले; Nupur Maniyar चा दुर्दैवी अंत

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: बदलाचे साक्षीदार नव्हे, शिल्पकार व्हा! लाडक्या बहिणींना मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version