BCCI ची मोठी अपडेट, IPLच्या दोन सामन्यांची तारीख बदलली!

आयपीएल कडून एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. आयपीएल मधील दोन सामन्यांची तारीख बदलण्यात आली असल्याचे, आयपीएलच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून कळवले गेले आहे.

BCCI ची मोठी अपडेट, IPLच्या दोन सामन्यांची तारीख बदलली!

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) (IPL) १७ व्या हंगामाची धडाक्यात सुरुवात झाली आहे. क्रिकेट फॅन्स आपल्या आवडत्या टीम्सला सपोर्ट करत आहेत. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात क्रिकेट फॅन्स आपल्या आवडत्या टीमला आणि खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये मोठी गर्दी करत आहेत. सोशल मीडियावर देखील आयपीएलचाच ट्रेंड वेळोवेळी दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटापर्यंत क्रिकेट रसिकांना हा क्रिकेटचा जल्लोष अनुभवता येणार आहे. अश्यातच, आयपीएल कडून एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. आयपीएल मधील दोन सामन्यांची तारीख बदलण्यात आली असल्याचे, आयपीएलच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून कळवले गेले आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.

आयपीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता विरुद्ध राजस्थान हा सामना आधी १७ एप्रिल ला होणार होता. आता मात्र या सामन्याची तारीख बदलून १६ एप्रिलला होणार आहे हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होणार आहे. तसेच दिल्ली विरुद्ध गुजरात हा सामना आधी १६ एप्रिलला होणार होता. आता या सामन्याची तारीख बदलून १७ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे.

यंदा १७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे, पोलिस विभागाला सुरक्षा पुरवणे शक्य होणार नसल्याचे समजते. म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव या दोनीही सामन्याच्या तारखा बदलण्यात आल्याचे समजले जात आहे. म्हणूनच, कोलकाता विरुद्ध राजस्थान हा सामना १६ एप्रिलला तर दिल्ली विरुद्ध गुजरात हा सामना १७ एप्रिलला होणार आहे.

२२ मार्च पासून सुरु झालेल्या आयपीएलच्या या हंगामात क्रिकेट फॅन्सना दररोज अद्भुत सामने पाहायला मिळत आहेत. सर्वच संघांमध्ये चुरशीच्या लढती यावेळी पाहायला मिळत आहेत. साखळी सामने संपल्यानंतर २१ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. तसेच, २२ मे ला एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. याशिवाय, २४ मेला दुसरा क्वालिफायर सामना पार पडेल तर २६ मेला अंतिम सामना खेळवला जाईल.

हे ही वाचा:

मुंबईचा सलग तिसरा पराभव, काय म्हणाला Hardik Pandya?

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version