बीसीसीआयने इग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची केली घोषणा

बीसीसीआयने इग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची केली घोषणा

१० सप्टेंबरपासून खेळण्यात येणाऱ्या इग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय महिला क्रिकेट (IND vs ENG Women) संघाची निवड (BCCI) जाहीर करण्यत आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये टी-20 व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. दोन्ही संघांच्या नेतृत्वपदी हरमनप्रपीत कौर हिला कायम ठेवण्यात आले असून स्मृती मानधना ही देखील उपकर्णधारपदी कायम आहे. सध्या नागालँड मधून खेळणारी महाराष्ट्राची खेळाडू केपी नवगिरे हिला भारतीय संघामध्ये संधी देण्यात आली आहे. टी-२० सामने १०, १३ आणि १५ सप्टेंबरला तर एकदिवसीय सामने १८, २१, आणि २४ सप्टेंबरला खेळवले जातील.

दोबारा चित्रपट रिव्हिव: अनुराग कश्यप, तापसी पन्नूचे रहस्यमय नाटक तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील सर्व ६ सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळेल जाणार आहेत. टी- २० खेळ डरहममधील रिव्हरसाइड, डर्बीमधील इनकोरा काउंटी ग्राउंड आणि ब्रिस्टलमधील ब्रिस्टल काउंटी ग्राउंड येथे खेळले जातील. एकदिवसीय सामने लंडनमधील होव्ह, कॅंटरबरी आणि लॉर्ड्स येथील १ सेंट्रल काउंटी ग्राउंडवर खेळले जातील.
अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे आणि २१ वर्षीय जेमिमाह रॉड्रिग्ज, जी नुकतीच दुखापतीमुळे द हंड्रेड स्पर्धेतून बाहेर पडली होती, तिचा दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताचा टी- 20 संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमाह रॉड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सबिनेनी मेघना, भानिया (तानिया) ), राजेश्वरी गायकवाड, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, रिचा घोष (डब्ल्यूके), केपी नवगिरे या खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

हेही वाचा : 

दहीहंडी उत्सवात मुंबई-ठाण्यासह १०० हून अधिक गोविंदा जखमी तर, एकाचा मूत्यू

Exit mobile version