Ashish Shelar : BCCIनं सोपवली आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी; नवे खजिनदार म्हणून नियुक्ती

Ashish Shelar : BCCIनं सोपवली आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी; नवे खजिनदार म्हणून नियुक्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आज अखेर निरोप दिला. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईत पार पडली आणि त्यात रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. २०१९ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुलीसमोर कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं. त्यातही त्याने BCCI च्या टीमला सोबत घेऊन इंडियन प्रीमिअर लीगचे आयोजन युएई व भारतात करून दाखवला. पण आता १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे आता नवीन अध्यक्ष असणार आहेत. तर भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे बीसीसीआयने एक मोठी जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा : 

Diwali २०२२ : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीआधीच

खजिनदार म्हणून शेलार यांची निवड करण्यात आली आहे. ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आता शेलार यांच्याकडे असणार आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या तिरोजीत जवळपास ६००० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बैठकीत दिले आहे. आशिष शेलार हे जून २०१५मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. १२ जानेवारी २०१७ मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. आता BCCIच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाल्याने अनेकांकडून त्यांना शुभेच्छा येत आहेत.

लवकरच येणार प्लॅनेट मराठीवर ‘बेबी ऑन बोर्ड’ नवीन सीरिज

बीसीसीआयची नवी टीम

अध्यक्ष – रॉजर बिन्नी ( कर्नाटक), सचिव – जय शाह ( गुजरात), उपाध्यक्ष – राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश), खजिनदार – आशिष शेलार ( महाराष्ट्र), सर चिटणीस – देवाजित सैकिया ( आसाम), आयपीएल चेअरमन – अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)

राज्य सरकार शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार? या योजनेचं नेमकं झालं काय? – अजित पवार संतापले

Exit mobile version