spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BCCI कडे कर्णधार पदासाठी हे तीन नवे पर्याय

काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना पार पडला आणि दुसऱ्यांदा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली होती.

काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना पार पडला आणि दुसऱ्यांदा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली होती. पहिल्याच फायनलमध्ये पावसाने पहिल्याच दिवशी खेळ केला आणि याचा परिणाम कसोटी सामन्यावर झाला आहे. परंतु वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी हिरवी गार असून सुद्धा भारताच्या पदरी पराभवच पडला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच इंनिंगमध्ये ४६९ धावा ठोकल्या आणि त्यांच्या प्रत्युतरात भारताला फक्त २९६ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे १७३ धावांची आघाडी होती.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या इंनिंगमध्ये 270 धावांवर दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी ४४४ धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. दुसऱ्या डावांमध्ये भारतीय संघाला २३४ धावांपर्यत मजल मारता आली आणि भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना २०९ धावांनी गमावला. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन खेळवले नाही यावरून मोठा वाद पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने चार डावखुरे फलंदाज असूनही अश्विनला खेळवले नाही असे सवाल अनेक माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित केले आहेत. टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळताना कायम विश्रांतीवर जाणाऱ्या रोहित शर्माला कसोटी कर्णधारपद गमवावे लागू शकते अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

सध्या रोहित शर्मा तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे आता पुढेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सर्कल हे २०२३ ते २०२५ असणार आहे. त्यामुळे आता भारतीय कसोटी संघाची धुरा कोणाकडे सोपवण्यात येणार आहे याबाबतीत आता देशामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या प्रामुख्याने तीन नावे चर्चेत आहेत त्यामध्ये पहिले नाव विराट कोहली परंतु कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व सोडले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे तत्कालीन अधिकारी आणि विराट कोहलीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आल्यामुळे विराटने कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्याची चर्चा होती. त्यांनतर दुसरे नाव म्हणजेच अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणेने तब्बल १८ महिन्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले. अजिंक्यने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्याच डावात ८९ धावांची खेळी खेळली आणि त्यानंतर दुसऱ्या डावात ४६ धावा करत आपण पुन्हा फॉर्ममध्ये परतलो असल्याचे संकेत रहाणेने दिले आहेत. याआधी अजिंक्य रहाणेकडे कसोटीत कर्णधारपदही भूषवलं आहे. भारताने २०२०- २१ मध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची किमया केली होती. त्यामुळे आता त्याच दृष्टीने अजिंक्य रहाणे हा उत्तम पर्याय आहे.

 

बीसीसीआय तिसरा पर्याय म्हणजेच शुभमन गिल. शुभमन गिल हा फक्त २३ वर्ष आहे परंतु त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे आता त्याने टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली आहे. आतापर्यत शुभमन गिलने यापूर्वी कधीही भारताचे नेतृत्व केलेले नाही. परंतु मात्र २०१९- २० मध्ये देवधर ट्रॉफीत भारताच्या ‘क’ संघाचे नेतृत्व केले आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, मयांक अग्रवाल आणि अक्षर पटेल हे त्याच्या नेतृत्वाखाली खेळले होते. त्यामुळे गिल हा पुढच्या सहा वर्षासाठी भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो.

हे ही वाचा:

लवकरच गाड्यांचा वेग वाढणार, Nitin Gadkari यांनी दिली माहिती!

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

तुम्ही Dahi Toast कधी ट्राय केला आहे का? नसेल तर ही लज्जतदार रेसिपी फक्त तुमच्या साठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss