भारत – पाक लढण्याआधीच, गोलंदाज राहुल शर्माने घेतली निवृत्ती

सध्या आशिया चषक स्पर्धेची सगळीकडे धूम असून आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यात कोणाचा विजय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

भारत – पाक लढण्याआधीच, गोलंदाज राहुल शर्माने घेतली निवृत्ती

सध्या आशिया चषक स्पर्धेची सगळीकडे धूम असून आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यात कोणाचा विजय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसाठीदेखील आजचा सामना खास ठरणार आहे, कारण तो आपला १०० वा टी-२० क्रिकेट सामना खेळणार आहे. दरम्यान, एकीकडे भारत-पाक सामन्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज राहुल शर्मा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. यापूर्वी त्याने आयपीएल क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केलेली आहे.

राहुल शर्माने आयपीएल क्रिकेटमध्ये २०१० साली पदार्पण केले. या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. राहुल शर्माचा आयपीएल २०११ चा सीझन खूप चांगला होता. या हंगामात त्याने पुणे वॉरियर्सकडून खेळताना १४ सामन्यात १६ विकेट घेतल्या होत्या. यामुळेच या वर्षी त्याला टीम इंडियामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. ८ डिसेंबर २०११ रोजी भारतीय संघात पदार्पण करणारा राहुल शर्मा ४ वनडे आणि २ टी-२० सामने खेळला आहे. यादरम्यान ती आपली छाप सोडू शकली नाही आणि त्यानंतर तिला पुन्हा संघात संधी मिळू शकली नाही. राहुलने वनडेमध्ये केवळ ६ आणि टी-२० मध्ये ३ विकेट घेतल्या आहेत. राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या इंदूर वनडे सामन्यातून पदार्पण केले. २०१४ सालच्या आयपीएल हंगामात तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. त्यानंतर २०१५ साली त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने खरेदी केले होते.

राहुल शर्मा आपल्या करिअरमध्ये आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळून दिमाखदार कामगिरी केलेली आहे. आयपीएलसोबतच त्याने भारतीय क्रिकेट संघाचेदेखील प्रतिनिधित्व केलेले आहे. त्याने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तसेच दोन टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी गोलंदाजी केली. मात्र करिअरला निश्चित दिशा मिळालेली असताना त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे आरोप करण्यात आले. परिणामी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याला बराच काळ झगडावे लागले. ऐन उमेदीच्या काळात त्याला भारतीय क्रिकेट संघातील स्थान गमवावे लागले.

हे ही वाचा:

आज रंगणार भारत – पाकिस्तान ‘महामुकाबला’

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version