spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, विराट कोहलीचे BCCIला पत्र T20 मधून ब्रेक घेणार असल्याची दिली माहिती

नवी निवड समिती आली नसल्याने चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील जुनी निवड समिती संघासाठी खेळाडूंची निवड करणार आहे.

श्रीलंका मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारताचा पुढील सामना श्रीलंकेशी होणार आहे.दोन्ही संघांमध्ये ३, ५ आणि ७ जानेवारीला ३ T20 सामने खेळवले जातील. १०, १२ आणि १५ जानेवारीला ३ एकदिवसीय सामने होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवी निवड समिती आली नसल्याने चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील जुनी निवड समिती संघासाठी खेळाडूंची निवड करणार आहे. असे असताना विराट कोहलीच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. त्‍याने म्‍हटले आहे की त्‍याने T20 क्रिकेटच्‍या मॅचेसमधून काही काळ ब्रेक घेणार असून केवळ ५० षटकांचे क्रिकेट सामने आणि कसोटी क्रिकेटच्‍या मॅचवर लक्ष केंद्रित करणार आहे.

यामुळे कोहली श्रीलंकेतील T20 मालिकेत नक्कीच खेळणार नसल्याचे समोर आले आहे. मात्र महत्त्वाच्या सामन्यांदरम्यान तो संघात पुनरागमन करेल, असे म्हटले जात आहे.विराट कोहलीसोबतच रोहित शर्मा आणि के एल राहुलचीही हीच स्थिती आहे. विराट कोहलीसह हे खेळाडूसुद्धा T20 मालिकेदरम्यान अनुपस्थित असणार आहेत. तसेच, जानेवारीत होणाऱ्या श्रीलंकेच्या मालिकेत हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून काम पाहणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

भारत आणि श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

श्रीलंकेचा संघ आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना ५ जानेवारीला पुण्यात तर तिसरा आणि अंतिम सामना ७ जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्याच वेळी, यानंतर, दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाईल. ज्यांचा पहिला सामना १० जानेवारीला गुवाहाटी, १२ जानेवारीला कोलकाता, तर तिसरा आणि अंतिम वनडे १५ जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल.

हे ही वाचा:

मला धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटले, IPL लिलावात विकला न गेल्याने ‘या’ वेगवान गोलंदाजाने व्यक्त केले आश्चर्य

वाढत्या कोरोना संसर्गातही चीन हटवणार निर्बंध, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ८ जानेवारीपासून खुल्या करणार सीमा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss