पुर्थ्वी शॉची धडाकेबाज खेळी

पुर्थ्वी शॉची धडाकेबाज खेळी

भारताचा युवा क्रिकेटर फलंदाज पुर्थ्वी शॉ (Prithvi Shaw) ने जबरदस्त अशी कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉने झळकावलेल्या दमदार शतकामुळे १४० चेंडूत १४२ धावा पश्चिम विभागाने मध्य विभागाविरुद्धच्या दुलीप करंडक उपांत्य सामन्यावर पकड घट्ट केल्याचे दिसत आहे. तिसऱ्या दिवशी पश्चिम विभागाने आपली आघाडी ३५० धावांच्या पार पोहचवली आहे. पश्चिम विभागाच्या दुसऱ्या डावात पाठोपाठ विकेट पडत असताना सलामीवीर पृथ्वी शॉने आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पश्चिम विभागाच्या ३ बाद १३० धावा झाल्या होत्या.

आपली आक्रमक खेळी शॉने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील कायम ठेवत १४० चेंडूत १४२ धावा ठोकल्या. मात्र त्याला करण शर्माने बाद करत दीड शतकी मजल मारू दिली नाही. पृथ्वी शॉने आपली धडाकेबाज खेळी तब्बल १५ चौकार आणि ४ षटकार यांनी सजवली. त्याने १०१.४३ अशा भन्नाट स्ट्राईक रेटने धावा केल्या.

पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. अवघ्या आठ धावांवर तो बाद झाला. पहिल्या डावातही त्याची खेळी १२ धावांची होती. दोन्ही वेळेस अंकित राजपूतने त्याच्या यष्टींचा वेध घेतला. काही दिवसांपूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात रहाणेने द्विशतक केले होते. रहाणेप्रमाणे त्या सामन्यात द्विशतक करणारा यशस्वी जैसवालही अपयशी ठरला. त्यानंतर राहुल त्रिपाठी भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे पश्चिम विभागाचा संघ ३ बाद ८६ असा अडचणीत सापडला होता; परंतु पृथ्वीने ११ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १०४ धावा करून संघाचा डाव सावरला.

 

हे ही वाचा:

“चित्ता आणा किंवा सिंह, आम्हाला आमच्या हक्काचा वाटा हवा” बागचा ग्रामस्थांचा त्यांच्या हक्कांसाठी लढा

…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘ ठिकाणाची निवड

PM Narendra Modi Birthday 2022 : पंतप्रधानांच्या ७२ व्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छांचा वर्षाव, वाचा कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version