भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन

भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी अनेकदा सोशल मीडियापासून दूर राहतो, मात्र त्याने त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकल्याने चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. धोनी २५ सप्टेंबरला फेसबुकवर लाईव्ह करणार असल्याची पोस्ट त्याने शेयर केली होती. धोनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी तुमच्यासोबत एक बातमी शेअर करणार आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता लाईव्ह येऊन मी ही माहिती देईन. मला आशा आहे की तुम्ही सर्व तिथे असाल. परंतु, आज धोनीनं लाईव्हला येऊन अशा चर्चांना पूर्णविराम लावलाय. महत्वाचं म्हणजे, बिस्किट कंपनी ओरियाच्या (OREO Cookies) भारतातल्या पहिल्या लॉन्चसाठी धोनी लाईव्ह आला होता. त्यानं आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने रविवारी एक मोठी घोषणा केली. थला धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो म्हणून चाहते श्वास रोखून वाट पाहत होते. पण चाहत्यांना आता दिलासा मिळाला आहे. कारण ही फक्त एक मार्केटिंग नौटंकी होती. धोनी नवीन Oreo biscuit मोहिम BringBack2011 लाँच करत आहे. एमएसने फेसबुकवर पोस्ट करताच चाहत्यांनी अनुमान काढण्यास सुरुवात केली की धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना ही भीती वाटत होती. कत्याच पार पडलेल्या यूएस ओपन पाहण्यासाठी धोनी युनायटेड स्टेट्समध्ये शेवटचा दिसला होता. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे असलेल्या मेटूचेन गोल्फ आणि कंट्री क्लब (MGCC) चे मानद सदस्य म्हणून क्रिकेटपटूची ओळख झाल्यानंतर तो एक अद्भुत केक कापताना दिसला. त्यामुळे हा खास क्षण साजरा करण्यासाठी भारताचा माजी कर्णधार अतुल बेकरी यूएसएने खास त्याच्यासाठी तयार केलेला खास केक कापताना दिसला.

आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. २०१३ च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.

हे ही वाचा:

IND vs AUS, T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णायक

ठाकरे गटाला शिवतीर्थ देऊ नका, अशी मागणी आम्ही केली नव्हती – गुलाबराव पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version