spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कर्णधार Harmanpreet Kaur ने टी-२० मालिकांमध्ये झळकावले अर्धशतक

हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारताच्या संघाने टी-२० मालिकांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये सहज विजय मिळवला आहे.

हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारताच्या संघाने टी-२० मालिकांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये सहज विजय मिळवला आहे. चार महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मैदानात परतलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली आहे. स्वतः कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार अर्धशतक झळकावत संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. नवोदित फिरकीपटू मिन्नू मणीनेही भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारताच्या संघाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

भारताचा बांगलादेश दौरा होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताचा संघ या मालिकेसाठी काही नवीन खेळाडूंना संधी देत आहे. या मालिकेसाठी पहिल्यांदाच कर्णधार हरमनप्रीत कौरने २० वर्षीय डावखुरा फिरकीपटू बरेड्डी अनुषा आणि २४ वर्षीय ऑफस्पिनर मिन्नू मणी यांना संधी देण्यात आली आहे. बांगलादेशसमोर भारताला फारशी अडचण येईल असे वाटत नसले तरी भारतीय गोलंदाजांनी यजमानांना केवळ ११४ धावांवर रोखले. बांगलादेशकडून शोर्ना अख्तरने सर्वाधिक २८ धावा केल्या. संघाने पूर्ण २० षटके खेळली आणि फक्त ५ विकेट गमावल्या. भारताकडून वस्त्रकार, मिन्नू आणि शेफाली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताच्या संघासाठी हे लक्ष काही कठीण नव्हते परंतु सलामीवीर शेफाली वर्मा या सामन्यामध्ये अपयशी ठरली. डावाच्या तिसऱ्या चेंडूंवर ती खातेही मी उघडताच बाद झाली. त्याचवेळी चौथ्या षटकापर्यंत जेमिमा रॉड्रिग्जही पॅव्हेलियनमध्ये परतली होती. भारताच्या संघाची धावसंख्या २ बाद २१ धावा होती. बांगलादेशी संघ काही उलथापालथ करू शकण्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी ७० धावांची भागीदारी केली आणि भारताच्या संघाला विजयाच्या जवळ आल्यावर स्मृती बाद झाली, पण कर्णधार कौरने १७ व्या षटकात एक चौकार आणि षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.त्याचबरोबर भारताची कर्णधार हरमनप्रीतने ११ वे टी-२० अर्धशतकही पूर्ण केले.

हे ही वाचा:

ओबीसीच्या मुद्यावरून फडणवीस आणि पवारांमध्ये हेवेदावे

HAPPY BIRTHDAY MS DHONI, कॅप्टन कूलचा प्रवास | Indian Cricket Team | Captain Cool

शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता, अजित पवार हेच अर्थमंत्री?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss