IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर कर्णधार शिखर धवनचे मोठे वक्तव्य

IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर कर्णधार शिखर धवनचे मोठे वक्तव्य

नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर तिसरा आणि अखेरचा सामना खेळला गेला. या निर्णायक सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 99 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर सलामीवीर शुभमन गिलनं संयमी ४९ धावांची खेळी केली. भारतानं हा सामना २२.५ षटक शिल्लक ठेवून जिंकला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ नं जिंकलीय.

हेही वाचा : 

शिंदेगटाच्या नव्या चिन्हावर अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, ढाल भाजपची आणि तलवार…

आमच्या खेळाडूंनी जबाबदारी आणि परिपक्वता दोन्ही दाखवले: शिखर धवन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवन म्हणाला की, आमचा संघ मैदानावर ज्या प्रकारे खेळला त्याचा मला अभिमान वाटतो. आमच्या खेळाडूंनी जबाबदारी आणि परिपक्वता दोन्ही दाखवले. मी संघाच्या सपोर्ट स्टाफचे आभार मानू इच्छितो. पहिल्या सामन्यात आमच्याकडून खूप चुका झाल्या, पण आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो. या मालिकेत मी माझ्यावर कधीही दबाव वाढू दिला नाही. या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले. मला माझ्या संघासाठी सामने जिंकायला आवडतात. लवकरच टी-20 विश्वचषक सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा विजयामुळे आत्मविश्वास वाढतो.

MNS : ‘तुम्हालाच सत्तेत नेणार पण, मी स्वत: बसणार नाही’ ठाकरेंची मनसैनिकांना ‘भिष्म’ प्रतिज्ञा

दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शिखर धवन (८ धावा) आणि ईशान किशननं (१० धावा) सुरुवातीला संयमी खेळी केली. परंतु, भारताच्या डावातील सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार शिखर धवन रनआऊट झाला. त्यानंतर अकराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ईशान किशनच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. दरम्यान, युवा फलंदाज शुभमन गिल (४९ धावा) आणि श्रेयस अय्यरनं (नाबाद २८ धावा) संघाचा डाव सावरला. संघाला अवघ्या तीन धावांची गरज असतान शुभमन गिल आऊट झाला. अवघ्या एका धावानं त्याचं अर्धशतक हुकलं. भारतानं हा सामना सात विकेट्स राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी ,बी. फॉर्च्युन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

Narendra modi : PM मोदींच्या हस्ते उज्जैनमध्ये महाकालाची पूजा व कॉरिडॉरचे उद्घाटन

Exit mobile version